EPFO New Rule: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या करोडो सदस्यांसाठी एक मोठे अपडेट जारी केले आहे. आता सदस्य कोणत्याही कागदपत्रांशिवाय त्यांचे वैयक्तिक तपशील सहजपणे दुरुस्त करू शकतात. यामध्ये जन्मतारीख, नागरिकत्व, पालकांचे नाव, वैवाहिक स्थिती, जोडीदाराचे नाव, लिंग, कंपनी जॉइन करण्याची आणि सोडण्याची तारीख यासारख्या माहितीचा समावेश आहे. अपडेटसाठीच्या विनंत्या प्रलंबित असलेल्या 3.9 लाख सदस्यांना या बदलामुळे फायदा होईल. आता ते त्यांची प्रलंबित विनंती रद्द करू शकतात आणि नवीन आणि सोप्या प्रक्रियेअंतर्गत ती पुन्हा सबमिट करू शकतात.
ईपीएफओने आपल्या सिस्टीममध्ये अनेक अपडेट्स केले आहेत, जेणेकरुन आता सदस्य कोणत्याही कागदपत्रांशिवाय त्यांचे वैयक्तिक तपशील सहजपणे दुरुस्त करू शकतील. यामध्ये नावाचे स्पेलिंग, जन्मतारीख, पालकांची नावे, लिंग, वैवाहिक स्थिती, जोडीदाराचे नाव आणि कंपनीतून प्रवेश आणि बाहेर पडण्याची तारीख यासारख्या माहितीचा समावेश आहे. या नवीन अपडेटमुळे सदस्यांना त्यांची माहिती संपादित करणे सोपे होणार आहे.
कोण अपडेट करू शकतो –
EPFO ने माहिती दिली की ही सुविधा फक्त त्या सदस्यांसाठी उपलब्ध आहे ज्यांचे युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) नंबर आधारशी लिंक आणि सत्यापित आहे. तक्रारी कमी करणे आणि प्रलंबित विनंत्यांचे त्वरीत निराकरण करणे हा या प्रक्रियेचा उद्देश आहे. पूर्वी, बदलासाठी नियोक्त्याकडून पडताळणी आवश्यक होती, ज्यासाठी अंदाजे 28 दिवस लागत. आता या नवीन सुविधेमुळे सदस्यांना त्यांची माहिती सहज अपडेट करता येणार असून ही प्रक्रिया अधिक जलद आणि सोपी झाली आहे.
आधारशी पॅन लिंक करणे आवश्यक –
सर्व प्रथम EPFO सदस्यांना त्यांचे आधार कार्ड पॅनशी लिंक आहे की नाही हे सुनिश्चित करावे लागेल. लिंक नसेल तर आधी दोन्ही लिंक करणे आवश्यक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजूनही 50% माहिती अपडेट करण्यासाठी EPFO ची मंजुरी आवश्यक असेल. उर्वरित माहिती सदस्य स्वत: अपडेट करू शकतात. वाढत्या तक्रारी कमी व्हाव्यात आणि त्यांचे निराकरण लवकर व्हावे यासाठी हे पाऊल उचलले जात आहे.
कसे अपडेट करावे –
अपडेट करण्यासाठी, प्रथम EPFO वेबसाइटवर जा आणि तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. त्यानंतर वरील ‘मॅनेज’ टॅबवर क्लिक करा. तुम्हाला नाव, जन्मतारीख किंवा लिंग यासारखी माहिती अपडेट करायची असल्यास, ‘मूलभूत तपशील सुधारित करा’ पर्याय निवडा. आधार कार्डानुसार योग्य माहिती भरा आणि लक्षात घ्या की ईपीएफ आणि आधारचा तपशील सारखाच असावा. आवश्यक असल्यास आधार, पॅन किंवा जन्म प्रमाणपत्र यांसारखी कागदपत्रे अपलोड करा.