EPFO – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) एक नवीन डिजिटल सुविधा सुरू केली आहे. आता कर्मचारी आपला चेहरा दाखवून आधारच्या मदतीने युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) तयार आणि सक्रिय करू शकतात. या नव्या तंत्रज्ञानामुळे चुका कमी होतील आणि कर्मचार्यांना सोपे होईल, असा EPFO चा उद्देश आहे. यापूर्वी UAN फक्त कंपन्याच तयार करत होत्या. पण त्यात वडिलांचे नाव किंवा मोबाइल नंबर चुकीचे टाकले जायचे. काही कंपन्या तर कर्मचार्यांना UAN ची माहितीही देत नव्हत्या. त्यामुळे UAN सक्रिय करण्यास उशीर लागायचा. आधार OTP चा वापर करून वेगळी प्रक्रिया करावी लागायची, ज्यामुळे गोंधळ व्हायचा. आता EPFO ने UMANG अॅपवर चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाने ही प्रक्रिया सोपी केली आहे. UAN कसा बनवायचा? कर्मचारी आणि कंपन्या UMANG किंवा AadhaarFaceRD अॅप वापरू शकतात. प्रक्रिया पहा – -अॅप गुगल प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरवरून डाउनलोड करा. – अॅप उघडा आणि ‘UAN Allotment and Activation’ हा पर्याय निवडा. – आधार क्रमांक आणि जोडलेला मोबाइल नंबर टाका. – नियम स्वीकारा आणि OTP ने पडताळणी करा. – कॅमेर्याने तुमचा लाइव्ह फोटो काढा. – माहिती आधारशी जुळली की UAN तयार होईल आणि SMS ने माहिती मिळेल. – UAN आपोआप सक्रिय होईल आणि e-UAN कार्ड डाउनलोड करता येईल. काय फायदा? चेहरा ओळखल्याने ओळख पक्की होते, चुका टाळता येतात आणि विलंब होत नाही. कर्मचारी लगेचच पासबुक, KYC अपडेट आणि दावे यांसारख्या EPFO सेवा वापरू शकतात. ही सुविधा कर्मचार्यांसाठी खूपच सोयीची ठरणार आहे!