पिंपरी | भल्याची वाडी येथील आदिवासी बांधवांचा शिवसेनेत प्रवेश

कर्जत, (वार्ताहर) – तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीतील भल्याची वाडी येथील आदिवासी बांधवांनी उपतालुकाप्रमुख बाजीराव दळवी आणि ग्रामपंचायत प्रमुख महेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वतंत्र्यदिनाचे औचित्य साधत पक्षप्रवेशाचा सोहळा संपन्न झाला. कर्जत येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयात हा कार्यक्रम झाला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, कर्जत तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, संपर्कप्रमुख भिवसेन बडेकर, संघटक बाबू घारे, युवासेना विधानसभा अधिकारी अॅड. संपत हडप, पाथरज उपतालुकाप्रमुख बाजीराव दळवी,
जेष्ठ शिवसैनिक माधव कोळंबे, मोग्रज ग्रामपंचायत प्रमुख महेश जाधव, जाधववाडी शाखाप्रमुख किसन म्हसे, उक्रुल सरपंच योगेश थोरवे यांसह शिवसेना – युवासेना पदाधिकारी आणि आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रुप ग्रामपंचायत मोग्रज मधील भल्याची वाडी येथील आदिवासी बांधवांनी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी भल्याची वाडी येथील रामदास भला, हरीचंद्र भला,
अरुण भला, राजेश आगीवले, पंढरीनाथ भला, सुनील सांबरी, नितीन भला, मोहन भला, प्रकाश भला, भरत सांबरी, कैलास भला, सागर भला, मच्छिंद्र भला, करण दरवडा, पंकज आगीवले, प्रेम भला, योगेश भला यांनी पक्षप्रवेश केला.
पक्ष प्रवेशांमुळे कर्जत तालुक्यात शिवसेना उबाठा पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. मतदारसंघात पक्ष बांधणी मजबूत होतांना दिसत आहे. सर्व आदिवासी समाज बांधवांचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी पक्षात स्वागत करीत पुढील काळात पक्षाच्या वतीने ताकद देण्याचे आश्वासन दिले.
आपले प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, तसेच आपल्याला कोणतीही समस्या असेल तर आमच्या समोर मांडाव्यात, जेणेकरून त्या समस्या तत्काळ सोडवण्यात येतील, असे आश्वासन नितीन सावंत यांनी दिले.





