Entertainment | हिरामंडीची बिब्बोजान म्हणजेच आदिती राव हैदरी लवकरच अभिनेता सिद्धार्थसोबत दुसरे लग्न करणार आहे. या जोडप्याने या वर्षी मार्चमध्ये गुपचूप लग्न केले. या जोडप्याने जवळच्या कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत वानपर्थीजवळील श्रीरंगापुरम मंदिरात एंगेजमेंट केली होती. आता आदिती राव आणि सिद्धार्थचे लग्न कधी आणि कुठे होणार यांची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. आदिती राव हैदरी यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थसोबतच्या तिच्या लग्नाची माहिती दिली. अभिनेत्री म्हणाली, “लग्न वानपर्थी येथील 400 वर्षे जुन्या मंदिरात होणार आहे जे माझ्या कुटुंबासाठी महत्त्वाचे आहे.” यादरम्यान आदितीने तिच्या प्रपोजलचा दिवसही आठवला आणि एक रंजक गोष्ट शेअर केली. आदिती राव आणि सिद्धार्थ यांची पहिली भेट २०२१ मध्ये महा समुद्रम चित्रपटाच्या सेटवर झाली होती. अभिनेत्रीने सांगितले होते की, जेव्हा सिद्धार्थ तिला पहिल्यांदा भेटला तेव्हा त्याने तिला हॅलो ब्युटीफुल गर्ल म्हटले. ही गोष्ट तिच्या मनाला भिडली ते आणि त्यानंतर ते डेट करायला लागले. यासोबतच अदिती राव हैदरीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती शेवटची ‘चिठ्ठा’ चित्रपटात दिसली होती. त्यासोबतच संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘हिरामंडी’ या वेबसिरीजमध्ये दिसली. याशिवाय तिच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत ज्यात ती दिसणार आहे.