अँजेलिना जोलीची लेक शिलोने बदलले,’नाव’

hollywood अँजेलिना जोलीची लेक शिलोह जोली पिटने आता वडील ब्रॅड पिटसोबतचे सर्व संबंध तोडण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. नाव बदलण्यासाठी शिलोहने लॉस एंजेलिसच्या एका वृत्तपत्रात मोठी जाहिरात दिली. यासाठी शिलोह जोली पिटने आपल्या नावातून ‘पिट’ हे आडनाव काढून टाकत असल्याची घोषणा केली आहे. 18 वर्षीय शिलोह जोली पिटने असे पाऊल उचलले कारण कायदेशीररित्या नाव बदलण्यास न्यायालयाची मंजुरी देणे आवश्यक आहे.
नावामधून वडील ब्रॅड पिटचे आडनाव हटवल्याची बातमी पहिल्यांदा मे २०२४ मध्ये आली होती. त्याच वेळी, धाकटी मुलगी विव्हियननेही तिच्या नावावरून वडिलांचे आडनाव काढून टाकले. तेव्हापासून ब्रॅट पिट आणि त्याच्या मुलींचे नाते बिघडल्याची जोरदार चर्चा होती.
अँजेलिना जोली आणि ब्रेट पिट यांच्या विभक्त झाल्यानंतर, शिलोह जोली पिट ही तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिलेल्या नावावरून तिच्या वडिलांचे आडनाव काढून टाकणारी पहिली व्यक्ती होती. शिलोने आता तिचे नाव शिलोह नूवेले जोली पिट वरून बदलून शिलोह नूवेले जोली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी शिलोने तिचे नाव बदलण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि आता ही जाहिरात वर्तमानपत्रात आली असून, त्यात नाव बदलण्याची घोषणा करण्यात आली आहे.
कॅलिफोर्नियाच्या कायद्यानुसार, जर कोणी नाव बदलण्यास असहमत असेल तर त्यांना या महिन्याच्या अखेरीस न्यायालयात हजर राहावे लागेल. तसे न केल्यास शिलो तिचे नाव बदलेल. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा दोन्ही मुलींनी त्यांच्या वडिलांचे आडनाव काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा ब्रॅड पिट हे जाणून खूप दुःखी झाले होते.
ब्रॅड पिटला नेहमीच मुलगी हवी होती आणि शिलो त्याच्यासाठी खूप खास होती. ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली 2016 मध्ये वेगळे झाले. रिपोर्ट्सनुसार, तेव्हापासून ब्रॅड पिट आणि त्याच्या 6 मुलांमधील अंतरही वाढू लागले. ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली अनेक वर्षांपासून घटस्फोटासाठी लढत आहेत. अँजेलिना जोलीने असा दावा केला की माजी पती ब्रॅड पिटने तिला आणि मुलांनी शॅटो मिरवल येथून परत आल्यानंतर त्यांना मारहाण केली.





