Entertainment । सध्या दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता धनुष त्याच्या वक्तव्यामुळे टीकेच्या भोवऱ्यात सापडला आहे. अभिनेत्याचा पुढील चित्रपट ‘रायन’ 26 जुलै 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे आणि या चित्रपटाच्या ऑडिओ लॉन्च आणि प्रमोशन दरम्यान, धनुषने सांगितले की, तो देखील एक बाहेरचा माणूस ( आऊटसाईडर ) आहे आणि त्याने येथे पोहोचण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. यावेळी त्याने पोस गार्डनमध्ये घर घेण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचे सांगितले. रजनीकांत आणि तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांची घरे याच भागात आहेत. त्याने स्वःताला गरीब आणि आऊटसाईडर म्हटल्याने आता युजर्सने ला सुनावले आहे . दरम्यान, धनुषने पोस गार्डनमध्ये घर खरेदी केल्यावरून ट्रोल झाल्यानंतर आपली भूमिका मांडली. तो म्हणाला, ‘पोस गार्डनमध्ये घर विकत घेणे हा एवढा मोठा प्रश्न आहे हे मला माहीत असते तर मी फक्त एक लहान अपार्टमेंट घेतले असते. मी पोस गार्डनमध्ये घर घेऊ नये का? जर मी रस्त्यावर राहतो तर मी तिथेच राहू का?’ असा प्रश्नही त्याने उपस्थित केला. धनुषने सांगितले की, ‘मी १६ वर्षाचं होत तेव्हा, पहिल्यादाच जयललिता यांचे घर असल्याचे आम्हाला माहिती झाले. मी बाईक थांबवली आणि पाहिलं, एका बाजूला रजनी सरांचे घर आहे, तर दुसऱ्या बाजूला जयललिता अम्मा यांचे घर आहे. मी मनात विचार केला की एके दिवशी मला पोस गार्डन सारख्या पॉश एरियात एक छोटंसं घर घ्यायचं आहे.’ असं म्हणत त्याने ट्रोलर्सला उत्तर दिले.