मुंबई – जेम्स कॅमेरॉनच्या ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ अर्थात अवतार 2 या चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा सायन्स फिक्शन चित्रपट 16 डिसेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून चाहते त्याच्या OTT रिलीजची वाट पाहत आहेत. आता लवकरच याबाबतची प्रतीक्षा संपणार आहे. मात्र यातही मोठा ट्विस्ट असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे.
जेम्स कॅमेरॉन आणि टीम चित्रपटाच्या ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहेत. अवताराचे निर्माते लवकरच प्रेक्षकांना मोठी भेट देणार आहे. अशी माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे शेअर करण्यात आली. २८ मार्च २०२३ रोजी प्रेक्षक घरबसल्या हा चित्रपट पाहू शकणार आहेत.परंतु फ्रीमध्ये हा चित्रपट उपलब्ध होणार नसून त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. जसे थिएटर्समध्ये एखादा चित्रपट पाहण्यासाठी तिकीट काढावे लागते अगदी तसेच ओटीटीवर चित्रपट पाहण्यासाठी ठराविक रक्कम द्यावी लागणार आहे.
Return to Pandora whenever you want at home, only on Digital March 28. Get access to over three hours of never-before-seen extras when you add #AvatarTheWayOfWater to your movie collection. pic.twitter.com/88NRm5vKJC
— 20th Century Studios (@20thcentury) March 7, 2023
अवतारच्या दुसऱ्या भागाने जगभर धुमाकूळ घातला होता. सर्वाधीकी बजेट असलेल्या या सिनेमाने छप्परफाड कामे केली होती. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजचे वेध लागले होते. आता निर्मात्यांनी पेड स्वरूपात ओटीटी रिलीजची घोषणा करत तारीख स्पष्ट केली आहे. मात्र अद्याप चित्रपट कोणत्या ओटीटीवर प्रदर्शित होणार याचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. जेम्स कॅमेरूनचा पहिला चित्रपट ‘अवतार’ 2009 मध्ये आला होता. त्यानंतर तब्बल बारा वर्षांनी चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला होता.