#ENGvIND 3rd ODI : पंड्याची अनोख्या विक्रमाला गवसणी

लंडन – भारताचा अष्टपैलु क्रिकेटपटू हार्दिक पंड्या याने इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील रविवारी झालेल्या निर्णायक लढतीत एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली.
पंड्याने या सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी करताना एकाच सामन्यात अर्धशतक व चार बळी मिळवण्याची विक्रमी कामगिरी केली व दिग्गजांच्या पंक्तिक स्थान मिळवले.
एकाच एकदिवसीय सामन्यात 50 पेक्षा जास्त धावा आणि 4 बळी घेणारा पंड्या भारताचा चौथा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी भारताकडून अशी कामगिरी कृष्णम्माचारी श्रीकांत, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व युवराज सिंग यांनी केली आहे.
दरम्यान, ऋषभ पंतचे शतक व हार्दीक पंड्याने केलेल्या अष्टपैलु खेळाच्या जोरावर रविवारी भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान इंग्लंडचा 5 गडी राखून पराभव करत तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली.





