Ashes 2021-22 | ॲशेस विजयाचा रूटला विश्वास
Updated On:

लंडन – भारतीय कसोटी संघाच्या ऑस्ट्रेलियामधील कसोटी मालिका विजयाने इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट प्रभावित झाला आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वाला आव्हान दिल्याने उर्वरित संघांनाही आत्मविश्वास मिळाला आहे.
त्यामुळे यापासूनच प्रेरणा घेत इंग्लंडचा संघही यंदा ऑस्ट्रेलियाला पराभूत करत ॲशेस कसोटी मालिका जिंकेल, असा विश्वास रूटने व्यक्त केला आहे.
भारताने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. भारताच्या या विजयाने इंग्लंड संघाचाही आत्मविश्वास उंचावला आहे, असा विश्वास रूटने व्यक्त केला.





