चेंडूला सॅनिटायझर; गोलंदाज निलंबित
Updated On:

लंडन – ऑस्ट्रेलियन वंशाचा इंग्लंडचा क्रिकेटपटू व गोलंदाज मिश क्लायडन याला चेंडूला सॅनिटायझर लावल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.
सक्सेस संघाकडून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमधील मिडलसेक्स विरुद्धच्या सामन्यात त्याने चेंडूला सॅनिटायझर लावले होते. त्याने या डावात तीन बळी घेतले होते. मात्र, ही घटना पंचांनी पाहिली व सामनाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. व्हिडीओ चित्रण पाहिल्यावर त्यांनी क्लायडेनला निलंबित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
करोनाचा धोका अद्याप कायम असताना त्यापासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. मात्र, त्यासाठी चेंडूला सॅनिटायझर लावणे योग्य नाही. त्याची ही कृती क्रिकेटसाठी तयार केलेल्या नव्या नियमांचा भंग ठरल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.





