चेस्टर-ले-स्ट्रीट :- जो रूटने सचिन तेंडुलकरचा १५,९२१ धावांचा कसोटी विक्रम मोडला नाही, तरीही तो आपल्या देशाचा कसोटी क्रिकेटमधील सर्वकालीन महान फलंदाज होईल, असा विश्वास इंग्लंडचा माजी फलंदाज इयान बेल यांनी व्यक्त केला आहे. रुटने अलीकडेच श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज कुमार संगकाराला मागे टाकत कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. लेजेंड्स लीग क्रिकेटच्या निमित्ताने पीटीआयशी केलेल्या खास संवादात बेल म्हणाला, “गेल्या 12 महिन्यांत रूटने अविश्वसनीय कामगिरी केली आहे. तो भविष्याचा फारसा विचार करत नाही असे मला वाटत नाही. तो म्हणाला, “सचिनसारख्या महान खेळाडूच्या जवळ जाणे ही देखील एक मोठी उपलब्धी आहे. सचिन हा खऱ्या अर्थाने महान खेळाडू आहे, ज्याला खेळताना आपण मोठे झालो आहोत. तो केवळ भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठीच नाही तर जगभरातील लोकांसाठी हिरो आहे. इंग्लंडकडून ११८ कसोटी सामने खेळलेल्या ४२ वर्षीय इयान बेल म्हणाला की, “रूट सचिनच्या जवळ जाऊ शकतो, असे वाटणे ही एक मोठी उपलब्धी आहे. सचिनचा विक्रम तो मोडू शकला की नाही, तो इंग्लंडचा सर्वकालीन महान फलंदाज म्हणून ओळखला जाईल यात शंका नाही.” जो रूट सध्या ३३ वर्षांचा असून त्याने कसोटी क्रिकेटमध्ये १२४०२ धावा केल्या आहेत. अशाप्रकारे तो तेंडुलकरच्या विक्रमापेक्षा अजून ३५१९ धावांनी मागे आहे. Retirement : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून का घेतली निवृत्ती? शिखर धवनने स्वतः कारण केले स्पष्ट… प्रशिक्षक मॅक्युलममुळे इंग्लंड संघात सुधारणा… प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम व कर्णधार बेन स्टोक्स यांचे सूर जुळल्यापासून इंग्लंडसंघाने चांगली प्रगती साधली आहे. जॅक क्रॉली, ऑली पोप, हॅरी ब्रूक यांसारख्या युवा खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करून दाखविली आहे, असे बोलताना बेल म्हणाले. विश्वकसोटी स्पर्धेत इंग्लंड सध्या पाचव्या स्थानी असून आगामी काळात इंग्लंडला पाकिस्तान संघासोबत तीन सामन्याची कसोटी मालिका खेळायची आहे.