England Cricket : बेन स्टोक्स बनला इंग्लंडचा नवा कसोटी कर्णधार
Updated On:

लंडन – ज्यो रूटने इंग्लंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोडल्यावर आता अष्टपैलू बेन स्टोक्स याच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचे इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने सांगितले आहे.
रूटने यंदाच्या ऍशेस कसोटी मालिकेतील अपयशानंतर कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्याचवेळी संघातील सर्वात अनुभवी खेळाडूकडे हे पद सोपवले जाणार असल्याचे सांगत मंडळाने आपला होरा स्टोक्सकडेच असल्याचे सांगितले होते.
स्टोक्सने कर्णधार पदाची जबाबदारी स्वीकारण्यास होकार दिला होता. संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी दक्षिण आफ्रिकेचे गॅरी कर्स्टन व ऑस्ट्रेलियाचे सायमन कॅटिच यांच्या नावाची चर्चा आहे.
कर्स्टन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने 2011 साली झालेली एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे इंग्लंड मंडळाचे पारडे त्यांच्यासाठीच जड असल्याचे सांगितले जात आहे.





