ENG vs PAK 2nd T20I : बटलरचे दमदार अर्धशतक, इंग्लंडचा पाकिस्तानवर दमदार विजय….

एजबस्टन – इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरच्या 51 चेंडूत 84 धावांच्या खेळीमुळे इंग्लंडने चार सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव केला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने फलंदाजी करताना 7 गड्यांच्या मोबदल्यात 183 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा डाव 19.2 षटकांत 160 धावांवर आटोपला.
England claim a 23-run win in the second T20I to take a 1-0 lead in the series.#ENGvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/IX9kvqKWqO
— Pakistan Cricket (@TheRealPCB) May 25, 2024
बटलरच्या अर्धशतकाशिवाय विल जॅकने 37 धावांची खेळी खेळली. त्याचबरोबर गोलंदाज रीस टोपलीने 3 बळी घेतले आणि 385 दिवसांनी पुनरागमन करणाऱ्या जोफ्रा आर्चरने 2 बळी घेतले. पाकिस्तानकडून फखर जमानने 21 चेंडूत सर्वाधिक 45 धावा केल्या. तर शाहीन शाह आफ्रिदीने ३ बळी घेतले. पहिला सामना पावसामुळे वाहून गेला होता. या मालिकेत इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
इंग्लंडकडून रीस टोपलेने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याला 3 विकेट मिळाल्या. याशिवाय जोफ्रा आर्चर आणि मोईन अलीने 2-2 विकेट घेतल्या. तर ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद आणि लियाम लिव्हिंगस्टन यांना 1-1 यश मिळाले.
बाबरने रोहितला टाकले मागे
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने या सामन्यात आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या रोहित शर्माला मागे टाकले. बाबरने 26 चेंडूंत 32 धावा केल्या ज्यामुळे त्याच्या धावांची संख्या 3,987 झाली. ही संख्या पार करण्यासाठी त्याला 111 डाव लागले. तर रोहितच्या नावावर सध्या ३,९७४ धावा आहेत. यासह बाबर आता एकूण यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर विराट कोहली ४०३७ धावांसह अव्वल स्थानावर आहे.




