ENG vs NZ 2nd Test (Day 1) : हॅरी ब्रुकच्या शतकाने इंग्लंड सुस्थितीत….

ENG vs NZ 2nd Test (Day 1,Wellington) :- हॅरी ब्रुकने शतक झळकावून देखील दुसऱ्या कसोटीमध्ये न्यूझीलंड विरुद्धचा खेळताना इंग्लंडचा पहिला डाव केवळ 280 धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून पाहुण्यांना फलंदाजीसाठी पाचारण केले.
An action-packed thriller of a day!
2️⃣8️⃣0️⃣ runs, another Harry Brook century and five wickets have put us in a very strong position on Day 1 💪 pic.twitter.com/hqz3c8Fe8N
— England Cricket (@englandcricket) December 6, 2024
झॅक क्रॉली (17), बेन डकेट (0), जेकब बेथेल (16) व जो रूट (03) हे झटपट बाद झाल्याने इंग्लंडची अवस्था 4 बाद 43 झाली होती. त्यानंतर मात्र हॅरी ब्रुक व ऑली पोप यांनी पाचव्या गड्यासाठी 174 धावांची भागीदारी केली. दरम्यान पोपने 66 धावांची खेळी करून बाद झाला.
हॅरी ब्रुकने इतर फलंदाजांना हाताशी धरून शतक पूर्ण केले. ब्रुकने 123 धावांच्या खेळीत 11 चौकार व 05 षटकार लगावले. न्यूझीलंडकडून नॅथन स्मिथने 4, विल ओ’रुर्केने 3 तर मॅट हेन्रीने 2 गडी बाद केले.
न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात देखील अडखळत झाली. कर्णधार टॉम लॅथम (17), डेव्हॉन कॉन्व्हे (11), केन विल्यमसन (37), रचिन रवींद्र (03) व डॅरिल मिचेल (06) हे झटपट बाद झाल्याने न्यूझीलंडची अवस्था 5 बाद 79 अशी झाली. टॉम ब्लंडेल 7 तर विल ओ’रुर्के 0 धावांवर पहिल्या दिवसअखेर नाबाद राहिले. इंग्लंडकडे पहिल्या दिवस अखेर 194 धावांची आघाडी आहे.

