नवी दिल्ली : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात आज निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनावर राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील पुरंदरे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
कुछ वर्ष पूर्व बाबासाहेब पुरंदरे जी से भेंट कर एक लम्बी चर्चा करने का सौभाग्य प्राप्त हुआ था। उनकी ऊर्जा और विचार सचमुच प्रेरणीय थे। उनका निधन एक युग का अंत है। उनके परिजनों व असंख्य प्रशंसकों के प्रति संवदेनाएँ व्यक्त करता हूँ। प्रभु उन्हें अपने श्रीचरणों में स्थान दें। ॐ शांति pic.twitter.com/42vteArFwl
— Amit Shah (@AmitShah) November 15, 2021
काही वर्षांपूर्वी मला बाबासाहेब पुरंदरे यांना भेटण्याचे सौभाग्य लाभले आणि खूप चर्चा झाली. त्यांची ऊर्जा आणि कल्पना खरोखरच प्रेरणादायी होत्या. त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांसाठी माझ्या संवेदना.