नवी दिल्ली – गुजरातमधील गिर सोमनाथ जिल्ह्यातील सोमनाथ मंदिराच्या परिसरातील सुमारे 3 हेक्टर जागेवरील अतिक्रमणे राज्य सरकारने आज जमीनदोस्त केली. ही जमीन मंदिर ट्रस्ट आणि राज्य सरकारच्या मालकीची आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले.त्या भागात २१ पक्की घरे आणि १५३ झोपड्या होत्या, ती सर्व पाडण्यात आली.
पाच मामलतदार आणि सुमारे 100 महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. त्यासाठी तेथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सोमनाथ मंदिर अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत वेरावळ शहराजवळ प्रभास पाटण येथे आहे. हे भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी पहिले मंदिर असल्याचे मानले जाते आणि हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ आहे.
सोमनाथ मंदिर आणि राज्य सरकारचे व्यवस्थापन करणाऱ्या श्री सोमनाथ ट्रस्टच्या मालकीची जमीन रिकामी करण्यासाठी 21 अनधिकृत घरे आणि 153 झोपड्या पाडल्या जात आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी हरजी वाधवानिया यांनी दिली.
वाधवानिया म्हणाले की तीन हेक्टर (7.4 एकर) जमीन अतिक्रमणमुक्त केली जाईल आणि राज्य महसूल विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार कुंपण केले जाईल.अरबी समुद्राच्या किनाऱ्याजवळ वेरावळ शहराजवळ प्रभास पाटण येथे सोमनाथ मंदिर आहे.हे भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी पहिले मंदिर असल्याचे मानले जाते आणि हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ आहे.