एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक होणार निवृत्त; त्यापूर्वीच मिळाली मोठी जबाबदारी

Daya Nayak Retirement | एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख मिळवलेले दया नायक यांनी आपल्या कारकिर्दीत 87 गुन्हेगारांना ठार केले. 1990 च्या दशकात त्यांची दहशत अशी होती की दाऊद इब्राहिम, अरुण गवळी, अमर नाईक आणि छोटा राजन यांसारख्या गुंडांच्या टोळ्यांची दमछाक व्हायची.
31 वर्षांच्या सेवेनंतर दयानंद नायक हे 31 जुलैला मुंबई पोलीस दलातून निवृत्त होत आहेत. पण निवृत्तीच्या अगदी दोन दिवस आधी, 29 जुलै 2025 रोजी त्यांना सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बढती मिळाली आहे. दया नायक यांच्यासह जीवन खरात, दीपक दळवी व पांडुरंग पवार यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे.
अंडरवर्ल्डचं कंबरडं मोडण्यात ज्या अधिकाऱ्यांनी मोठी भूमिका बजावली आहे, त्या अधिकाऱ्यांमध्ये दया नायक यांचाही समावेश होतो. त्यांच्या ‘सिंघम’ स्टाईलमुळे त्यांचं नाव जगभरातील माध्यमांमध्ये चर्चिले गेले.
1995 मध्ये मुंबई टोळीयुद्धामध्ये झालेल्या गोळीबारात 1999 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दया नायक यांनी 19 गुंडांचा एन्काउंटर करून गुंड टोळ्यांना प्रत्युत्तर दिले होते. मुंबई पोलिसांनी 1998 मध्ये टॉप टेन गुंडांची यादी जारी केली होती. त्यातील सात गुंडाना नायक यांनी चकमकीत ठार केले होते.
कोण आहेत दया नायक?
कर्नाटकच्या किनारपट्टी भागातील एका गावातून दया नायक मुंबईत आले. पोटापाण्यासाठी त्यांनी लहानसहान नोकऱ्या केल्या. एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर 1995 साली दया नायक पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. दया नायक 1995 मध्ये जुहू पोलिस स्टेशनमध्ये अधिकारी म्हणून पोलिस दलात सामील झाले होते. 1990 च्या दशकात त्यांनी अनेक गुंडांना एन्काऊंटरमध्ये ठार करून आपली ओळख निर्माण केली.
भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
दया नायक यांची कारकीर्द नेहमीच चर्चेत राहिली नाही. नायक यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2006 मध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. माजी पत्रकार केतन तिरोडकर यांनी दावा केला होता की नायक यांच्याकडे त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती आहे. यानंतर अँटी-करप्शन ब्यूरोने त्यांना अटक केली आणि निलंबित करण्यात आले. पण 2012 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सर्व आरोप फेटाळून लावले आणि नायक पुन्हा पोलिस दलात परतले. Daya Nayak Retirement |
मोठ्या प्रकरणांच्या तपासात महत्त्वाची भूमिका
अलिकडच्या काही वर्षांत, नायक यांनी अनेक मोठ्या प्रकरणांच्या तपासात महत्त्वाची भूमिका निभावली. यात सलमान खानच्या घराबाहेर झालेली गोळीबार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि सैफ अली खानवर झालेला हल्ला यांसारख्या हाय-प्रोफाइल प्रकरणांचा समावेश आहे. याशिवाय, 2021 मध्ये अंबानींच्या घराजवळ
सापडलेले बॉम्ब प्रकरण आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या प्रकरणातही त्यांच्या टीमने मोठी भूमिका बजावली. Daya Nayak Retirement |
हेही वाचा :


