एनकाऊंटर फेम प्रदीप शर्मांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बांधले शिवबंधन

मुंबई : पोलीस खात्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले एनकाऊंटर फेम प्रदीप शर्मा यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत संध्याकाळी प्रदीप शर्मा हातावर शिवबंधन बांधून सेनेत प्रवेश केला. प्रदीप शर्मा यांना विधानसभा निवडणुकीसाठी नालासोपारा किंवा अंधेरीमतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने उमेदवारी दिली जाण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. बहुजन आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांना टक्‍कर देण्यासाठी शिवसेना प्रदीप शर्मा यांच्या रुपाने आपला उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, प्रदीप शर्मा यांचा शिवसेनेत प्रवेश निश्‍चित होताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. विरार पुर्व मनवेल पाडा तलावा शेजारील मातोश्री संपर्क कार्यालयाजवळ शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. सायंकाळी मातोश्रीवर जावून प्रदीप शर्मा यांनी उद्धव ठाकरे यांच्या हाताने शिवबंधन बांधून शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. दरम्यान, वसई विरारमध्ये ठाकूर कुटूंबीयांचे वर्चस्व आहे त्यांच्या विरोधात प्रदीप शर्मा यांच्या नावाचा आणि प्रसिद्धीचा वापर सेना करण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. तर तिकडे नालासोपारामधून क्षितीज ठाकूर रिंगणात उतरले तर प्रदीप शर्मा तुल्यबळ उमेदवार ठरू शकतात कारण या मतदारसंघात उत्तर भारतीयांची मतं निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे मुळेच उत्तर भारतीय असणारे प्रदीप शर्मा शिवसेनेसाठी मतांची बिदागी घेवून येणारे ठरू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.