छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; CRPF उपनिरीक्षक शहीद
Updated On:

रायपूर – छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात रविवारी सुरक्षा कर्मचारी आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) एक उपनिरीक्षक शहीद झाला आणि एक हवालदार जखमी झाला.सीआरपीएफच्या 165 व्या बटालियनचे एक पथक नक्षलविरोधी मोहिमेवर निघाले असताना जगरगुंडा पोलिस स्टेशन अंतर्गत सकाळी ही चकमक झाली.
बेद्रे कॅम्पपासून उरसंगल गावाच्या दिशेने सकाळी ७ वाजता ही कारवाई सुरू करण्यात आली.ऑपरेशन दरम्यान, गोळीबार झाला ज्यात उपनिरीक्षक सुधाकर रेड्डी ठार झाले आणि कॉन्स्टेबल रामू गोळी लागून जखमी झाला.गोळीबार थांबल्यानंतर, चार संशयितांना घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले. पकडण्यात आलेले संशयित नक्षलवाद्यांच्या कोणत्या गटाशी संबंधीत आहेत याची माहिती लगेच मिळू शकलेली नाही. त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध जारी आहे.





