गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 3 ते 4 नक्षलवादी ठार

गडचिरोली : गडचिरोलीतील छत्तीसगड सीमावर्ती भागात नक्षलविरोधी पोलीस पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत तीन ते चार नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या चकमकीत एक जवानदेखील जखमी झाला आहे. भामरागडमधील कोपरीच्या जंगलामध्ये पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात हि चकमक झाली.
गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील कोपरी हा शेवटच्या जंगल परिसर आहे. या भागात सध्या चकमक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या कोपरीच्या जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी जंगलात सर्च ऑपरेशन राबावले. यादरम्यान हि चकमक झाली.
धर्मराव बाबा आत्राम यांच्या सुरक्षेत वाढ
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. धर्माराव आत्राम आज भामरागड दौऱ्यावर आहेत. अशातच भामरागड तालुक्यात चकमक घडल्यामुळे आत्राम यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.





