Emraan Hashmi | बॉलिवूड अभिनेता म्हणजे इमरान हाश्मी सध्या ‘आवारापन 2’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र शूटिंग दरम्यान एक ॲक्शन सीन करताना त्याला मोठी दुखापत झाली. त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. आवारापन-२ च्या सेटवर अभिनेता इमरान हाश्मी गंभीर जखमी झाला आहे. पोटातील टिश्यू फुटल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि अभिनेत्यावर मोठी शस्त्रक्रिया करावी लागली. विशेष म्हणजे शस्त्रक्रिया होऊनही इमरानने चित्रपटाचं चित्रीकरण न थांबवता तो पुन्हा सेटवर परतला आहे. इमरानवर सध्या राजस्थानमधील शूटिंगच्या ठिकाणी डॉक्टरांच्या देखरेखीखाली शूट करत आहे. मात्र त्याच्या समर्पणामुळे टीमनेही त्याच्यासाठी शूटिंगचे वेळापत्रक बदलले, जेणेकरून त्याचे आरोग्य सुरक्षित राहील. Emraan Hashmi | इम्रान हाश्मीचा ‘आवारापन 2’ हा चित्रपट 2026 च्या एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘आवारापन’ चित्रपटाचा पहिला भाग 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता, पण तेव्हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. मात्र, रिलीज झाल्यानंतर त्याच्या कथेने आणि इम्रानच्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि नंतर त्या चित्रपटाने एक विशेष लोकप्रियता मिळवली. आता त्या चित्रपटाचा सिक्वेल ‘आवारापन 2’ थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. इम्रान शेवटचा चित्रपट ‘हक’ 7 नोव्हेंबर 2025 रोजी प्रदर्शित केला. या चित्रपटात त्याने यामी गौतमसोबत काम केले, आणि या कोर्टरूम ड्रामामध्ये त्याच्या अभिनयाला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. त्याचबरोबर, इम्रान ‘तस्करी: द स्मगलर्स वेब’ या आगामी वेब सिरीजमध्येही दिसणार आहे. Emraan Hashmi | हेही वाचा: Shraddha Kapoor: अमिताभ बच्चनसोबत कॉफी पिण्याची श्रद्धा कपूरची इच्छा, म्हणाली… मी तुमची सगळ्यात मोठी फॅन आहे!