मुंबई – महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी ‘सुरेखा पुणेकर’ लवरच आपल्या हाती राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा घेणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या होत्या.
परंतु आता प्रत्यक्षात येत्या १६ सप्टेंबर रोजी सुरेख पुणेकर मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यलयात अधिकृतरीत्या प्रवेश करणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित हा प्रवेश होणार आहे.
लावणी या लोकनृत्याची परंपरा जिवंत ठेवण्यात तसेच नवीन पिढीला या परंपरेची ओळख करून देण्यात सुरेखा पुणेकर यांचे मोठे योगदान आहे. मात्र, आता सुरेखा पुणेकर राजकीय मैदानात उतरणार आहे.
यावेळी सुरेख पुणेकर म्हणाल्या, “मी आतापर्यंत कलेची सेवा केली आणि जनसेवा करण्यासाठी राजकारणात यायचंय. महिलांचे प्रश्न सोडवायचे आहेत’ असं त्या म्हणाल्या. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने या बद्दल माहिती दिली आहे.