Elvish Yadav: एल्विश यादवची बॉलीवूडमध्ये एन्ट्री; रितेश देशमुखसह ‘या’ दिग्गज कलाकारांसोबत झळकणार!
Elvish Yadav एल्विश यादव ‘मालामाल वीकली २’ या आगामी कॉमेडी चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात त्याला मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळणार असल्याने त्याच्यासाठी हा अनुभव खास ठरणार आहे. आपल्या बॉलीवूड पदार्पणाची माहिती एल्विशने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली.

Elvish Yadav: ‘बिग बॉस ओटीटी २’चा विजेता आणि लोकप्रिय यूट्युबर एल्विश यादव आता मनोरंजनाच्या आणखी एका मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. सोशल मीडिया आणि यूट्युबवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर एल्विश आता अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे त्याचा पहिला बॉलीवूड सिनेमा हा रितेश देशमुख, परेश रावल, राजपाल यादव आणि रवीना टंडन यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत असणार आहे.
एल्विश यादव ‘मालामाल वीकली २’ या आगामी कॉमेडी चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात त्याला मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळणार असल्याने त्याच्यासाठी हा अनुभव खास ठरणार आहे. आपल्या बॉलीवूड पदार्पणाची माहिती एल्विशने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली.
‘बॉलीवूडमध्ये माझं कोणी ओळखीचं नव्हतं’
आपल्या पोस्टमध्ये एल्विशने त्याच्या प्रवासाबद्दल भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, तो बाहेरून आलेला आहे आणि बॉलीवूडमध्ये त्याचं कोणी ओळखीचं नव्हतं. मात्र, प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे तो आज या टप्प्यावर पोहोचला आहे.
एल्विशने सांगितलं की, प्रेक्षकांमधूनच आपला प्रवास सुरू झाला आणि त्याच प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आता मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळत आहे. आज तो जे काही आहे, त्यामागे चाहत्यांचं प्रेम असल्याचंही त्याने म्हटलं. त्यामुळे ‘मालामाल वीकली २’ हा त्याच्यासाठी केवळ एक चित्रपट नसून त्याच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे.
Malamaal Weekly 2 mein itne saare bade stars ke saath kaam karne ka mauka mil raha hai ❤️
Paresh ji, Rajpal ji, Ritesh bhai, Raveena ma’am, Shilpa ma’am… inse bohot kuch seekhne ko milega. 🙏✨
I’m truly grateful for this opportunity. ❤️ Bas umeed hai ki inse kuch seekh kar…
— Elvish Yadav (@ElvishYadav) August 13, 2026
दिग्गज कलाकारांकडून शिकण्याची संधी
‘मालामाल वीकली २’मध्ये रितेश देशमुख, परेश रावल, राजपाल यादव, रवीना टंडन आणि शिल्पा शेट्टी यांसारख्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने एल्विश उत्सुक आहे. या कलाकारांकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळणार असल्याचं त्याने म्हटलं आहे.
आपल्या दुसऱ्या पोस्टमध्ये एल्विशने या सर्व कलाकारांचे आभार मानले. त्यांच्या अनुभवातून शिकून प्रेक्षकांना आवडेल आणि चाहत्यांना अभिमान वाटेल, असं काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्याने सांगितलं.
यूट्युबर ते अभिनेता असा प्रवास
एल्विश यादवचा मनोरंजन क्षेत्रातील प्रवास यूट्युब आणि सोशल मीडियापासून सुरू झाला. व्लॉग्स आणि विविध प्रकारच्या कंटेंटमुळे त्याने तरुणांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली. मात्र, त्याला देशभरात मोठी ओळख मिळाली ती ‘बिग बॉस ओटीटी २’मुळे.
२०२३ मध्ये एल्विशने ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केला. विशेष म्हणजे वाइल्ड कार्डच्या माध्यमातून शोमध्ये येऊन विजेतेपद मिळवणारा तो पहिला स्पर्धक ठरला. या विजयानंतर त्याची लोकप्रियता आणखी वाढली. त्यानंतर त्याने विविध रिअॅलिटी शो आणि डिजिटल प्रोजेक्टमध्ये काम केलं.
आता एल्विश आपल्या करिअरमधील पुढचं पाऊल म्हणून बॉलीवूडकडे वळत आहे. ‘मालामाल वीकली २’च्या माध्यमातून त्याची अभिनयाची नवी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला नोव्हेंबरपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एल्विशचा मोठ्या पडद्यावरील अभिनय पाहण्यासाठी त्याचे चाहते नक्कीच उत्सुक असतील.





