दोन्ही बाजूला हत्ती अन्… ; थलपती विजयच्या नवीन पक्षाचा झेंडा लॉन्च

Thalapathy Vijay | दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता थलापती विजयने राजकारणात प्रवेश केला आहे. नुकतेच त्याने त्याच्या नवीन पक्षाच्या अधिकृत झेंड्याचे अनावरण केले आहे. त्याच्या पक्षाचे नाव ‘तमिझागा वेत्री कषगम’ असे आहे. त्याचा अर्थ ‘तामिळनाडू विजय पार्टी’ असा होतो. या वर्षाच्या सुरुवातीला, फेब्रुवारीमध्ये विजयने आपला नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती.
त्यानंतर आज चेन्नईच्या पायनूर येथील पक्षाच्या मुख्यालयात एका भव्य कार्यक्रमात पक्षाचा ध्वज आणि प्रतीक अधिकृतपणे लाँच केले. यावेळी पक्षाचे राष्ट्रगीतही सादर करण्यात आले. फ्लॅग लॉन्च इव्हेंटमध्ये, विजय मेळाव्याला संबोधित करताना पक्ष लवकरच एक मेगा कॉन्फरन्स आयोजित करेल, जिथे ते TVK ची तत्त्वे आणि उद्दिष्टे सांगतील, असे स्पष्ट केले. यापूर्वी ते स्वतःसाठी जगले असले तरी आता त्यांना तामिळनाडूच्या लोकांसाठी आपले जीवन समर्पित करायचे आहे यावर त्यांनी भर दिला.
View this post on Instagram
पार्टीच्या चिन्हाचे अनावरण करण्याआधी विजय थलपतीने शपथ घेतली. त्यानं म्हटलं की ‘आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे लढले आणि ज्यांनी बलिदान दिले त्या सैनिकांचे आम्ही नेहमीच कौतुक करू. तमिळनाडूच्या भूमीतील आपल्या लोकांच्या हक्कांसाठी अथकपणे लढणाऱ्या त्या अगणित सैनिकांचे योगदान आम्ही सदैव लक्षात ठेवू. जात, धर्म, लिंग, जन्मस्थान या नावावरचा भेदभाव मी दूर करेन. मी लोकांमध्ये जागृती निर्माण करेन आणि सर्वांना समान संधी आणि समान हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन.’ विजयच्या नवीन पक्षाचा झेंडा पिवळ्या आणि लाल रंगाचा आहे. ज्यात दोन्ही बाजूला हत्ती आणि मध्यभागी मोर आहे.
#WATCH | Chennai, Tamil Nadu: Actor and Tamilaga Vettri Kazhagam (TVK) chief Vijay takes pledge along with party workers and leaders at the party office in Chennai
“We will always appreciate the fighters who fought and sacrificed their life for the liberation of our country… pic.twitter.com/amiti3rBC2
— ANI (@ANI) August 22, 2024
अनेक कलाकारांचा राजकारणात प्रवेश
तामिळनाडूच्या राजकारणात सिनेतारकांचा प्रवेश हे काही नवीन नाही. एम.जी. रामचंद्रन (एमजीआर) ते जयललिता आणि शिवाजी गणेशन ते रजनीकांत, कमल हासन आणि विजयकांत यांच्यापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी रुपेरी पडद्यावरून राजकारणात प्रवेश केला आहे. आता थलपथी विजयचे नावही या यादीत सामील झाले आहे.
तामिळनाडूच्या राजकारणात या पक्षांचा दबदबा
राजकीय क्षेत्रात विजय यांचा पक्ष TVK, द्रविड मुन्नेत्र कळघम DMK आणि ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम AIADMK या सुस्थापित द्रविडीयन पक्षांशी स्पर्धा करेल. या पक्षांचा तामिळनाडूच्या राजकारणावर अनेक दशकांपासून दबदबा आहे. भारतीय जनता पक्ष देखील येथे आपले अस्तित्व सातत्याने वाढवत आहे.
हेही वाचा:
“राज्याचे मुख्यमंत्री एक संशयी आत्मा”; संजय राऊतांचा घाणाघात





