Delhi : दिल्लीकरांना बसणार वीज दरवाढीचा झटका

नवी दिल्ली – दिल्लीत आता वीज महाग होऊ शकते. दिल्ली इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन (DERC) ने PPAC (पॉवर पर्चेस ऍग्रीमेंट कॉस्ट) च्या माध्यमातून दिल्लीतील वीज दरात वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. त्यानंतर आता बीएसईएस भागात विजेचा वापर सुमारे 10 टक्क्यांनी महाग होईल. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय दिल्ली सरकारने घ्यायचा आहे.
मीडिया रिपोर्टसनुसार, दिल्ली इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनने पॉवर डिस्कॉम्स, बीवायपीएल, बीएसईस यमुना आणि बीआरपीएल (बीएसईएस राजधानी) च्या याचिका स्वीकारल्या आहेत.
विजेच्या दरात झालेल्या या वाढीचा परिणाम दक्षिण दिल्ली, पश्चिम दिल्ली, दिल्लीच्या ट्रान्स-यमुना परिसर, जुनी दिल्ली आणि नवी दिल्ली येथे राहणाऱ्या लोकांवर दिसून येईल. इतकेच नाही तर त्याचा स्पष्ट परिणाम एनडीएमसी परिसरात राहणाऱ्या लोकांवर होणार आहे. त्याचबरोबर वीज कंपन्यांनी याला सामान्य प्रक्रिया असल्याचे म्हटले आहे.
दरवर्षी वीज खरेदी करारात वीज दर वाढवण्याच्या प्रस्तावाबाबत वीजपुरवठा कंपन्यांना डीईआरसीकडून मंजुरी घ्यावी लागते, असे त्यांचे म्हणणे आहे. यावेळी तो मंजूर करण्यात आला आहे. विजेचे नवे दर ठरविण्याची प्रक्रिया सुरू आहे. जनतेच्या सूचनेनंतरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.
दिल्ली विद्युत आयोगाने बीएसईएसच्या अर्जाला मंजुरी दिली असून वीज खरेदी कराराच्या आधारे दर वाढवण्याची परवानगी दिली आहे. वाढलेल्या विजेच्या दरांचा दिल्लीतील जनतेच्या खिशावर परिणाम होईल की नाही, हे दिल्ली सरकारने ठरवायचे आहे.
दुसरीकडे, डीईआरसीने वीज दरात केलेल्या वाढीबाबत दिल्ली सरकारने विधान केले की, वाढलेल्या विजेच्या किमतींचा दिल्लीतील जनतेवर कोणताही परिणाम होणार नाही. वीज खरेदी करारांतर्गत विजेच्या किमती चढ-उतार होत राहतात.





