Pimpri : सांगवीत पाण्याच्या वेळेत वीज गायब

सांगवी : सकाळी आणि सायंकाळी पाणी येण्याच्या वेळेत बऱ्याचदा वीज जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी माजी नगरसेविका शारदा सोनवणे यांनी सांगवी महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केले. दरम्यान, पाणीपुरवठा होणाऱ्या वेळेत वीज नियमितपणे देण्याचे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले.
या आंदोलनामध्ये सांगवी परिसरातील जेष्ठ नागरिक, महिला व नागरिकांनी सहभाग नोंदवला. “पाणी आहे तर वीज नाही, वीज आहे तर पाणी नाही” या दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्येवर आवाज उठवला. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन आश्वासन दिले.
यावेळी मंडल अध्यक्ष गणेश ढोरे, शहर चिटणीस हिरेन सोनवणे, विकी सोनवणे, प्रदीप झांजुर्णे, विनायक शिंदे, अमित गवळी, हर्षद मोहारे, विशाल सोमवंशी, हृतिक काची, कविता जाधव, स्मिता देशपांडे, रिध्दी साबळे, कविता ढोरमले, पुनम ढोरमले, सुषमा नेमाडे, शोभा शिंदे, सुभाष जाधव, श्रीधर पंडित, संजय देशमुख, प्रदीप देशमुख, अविनाश मारणे, विलास दळवी, सुभाष भोळे, नारायण हिरवे, तुकाराम हाडोळे, श्री खांडे, नितीन पडाळघरे, दिवाण ढोकले, पद्माकर तेहरे, श्री स्वामी, श्री घोरपडे, तसेच मधुबन सोसायटी, आनंदनगर, सातपुडा सोसायटी व शितोळे नगर परिसरातील महिला भगिनी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.





