Electricity Bill : ऐन उन्हाळ्यात वीज दरात कपातीचा निर्णय वीज कंपन्यांनी (Electricity Bill) घेतल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यभरात 1 एप्रिलपासून नवीन दर लागू होणार आहे. महावितरण, बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवर या प्रमुख वीज कंपन्यांनी (Electricity Bill) सादर केलेल्या प्रस्तावाला राज्य वीज नियामक आयोगाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे घरगुती वीज ग्राहकांच्या खिशावरील भार कमी होणार आहे. नवीन दरपत्रकानुसार सर्वच युनिट स्लॅबमध्ये कपात करण्यात आली. महावितरणच्या 2025-26 ते 2029-30 या पाच आर्थिक वर्षांच्या बहुवार्षिक वीजदर याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने आपला आदेश नुकताच प्रसिद्ध केला आहे. महावितरणने पाच वर्षात वीजदर कपातीसाठी मांडलेला प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक अशा सर्व प्रवर्गातील ग्राहकांसाठीचे वीजदर 2030 पर्यंत टप्प्याटप्प्याने दरवर्षी कमी होणार आहेत. कोणत्याही प्रवर्गात वीजदर वाढणार नाहीत. Electricity Bill 2025 – 26 या आर्थिक वर्षात 0 ते 100 युनीटसाठी पूर्वी 4.76 रुपये द्यावे लागायचे. आता 2026 – 27 आर्थिक वर्षात 0 ते 100 युनीटसाठी 1 एप्रिलपासून 4.3 रुपये द्यावे लागणार आहे. याचा अर्थ वीज दरात 9.7 टक्के कपात करण्यात आली आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात 101 ते 300 युनीटसाठी पूर्वी 7.96 रुपये द्यावे लागायचे. आता 2026 – 27 आर्थिक वर्षात 101 ते 300 युनीटसाठी 1 एप्रिलपासून 7.1 रुपये द्यावे लागणार आहे. याचा अर्थ वीज दरात (Electricity Bill) 10.8 टक्के कपात करण्यात आली आहे. तसेच 301 ते 500 युनीटसाठी पूर्वी 13.55 रुपये द्यावे लागायचे. आता 11.64 रुपये द्यावे लागणार आहे. याचा अर्थ वीज दरात 14 टक्के कपात करण्यात आली आहे. तर 500 पेक्षा युनीटसाठी 14.55 रुपये द्यावे लागणार आहेत. 2026 – 27 या आर्थिक वर्षासाठी याच युनीटसाठी 12.64 रुपये द्यावे लागत होते. म्हणजेच वीज दरात 13.1 टक्के कपात करण्यात आली आहे.