पुणे – मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही आता “डबल डेकर’ बस धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गुरुवारी झालेल्या “पीएमपीएमएल’च्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यानुसार पहिल्या टप्प्यात 20 ईलेक्ट्रिक डबल डेकर बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ैठकीला पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह हे ऑनलाइन उपस्थित होते. तर, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया, सह व्यवस्थापकीय संचालक प्रज्ञा पवार-पोतदार यांच्यासह अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. बैठकीत डबल डेकर बसखरेदी, विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना आकारण्यात येणारा दंड, ई-कॅ खरेदी आदींबाबत चर्चा झाली. दरम्यान, पीएमपी प्रशासनाने मुंबईतील बेस्ट सोबत चर्चा करून माहिती देखील घेतली होती. या सर्व चर्चेअंती प्रशासनाने डबल डेकर बसखरेदीचा निर्णय घेतला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास टप्प्याटप्याने या बसेस वाढविण्यात येतील. दरम्यान, पहिल्या टप्प्यात खरेदी केल्या जाणाऱ्या डबल डेकर बस या पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आर्थिक सहाय्यातून खरेदी केल्या जाणार आहेत. या माध्यमातून एकावेळी जादा प्रवासी वाहून नेण्याची पीएमपीची क्षमता वाढणार असून, वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाचे प्रमाणही कमी होईल, असे प्रशासनाचे नियोजन आहे. फुकट्यांना आता 500 रु. दंड पीएमपीने प्रवास करताना विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशाप्रकारे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना प्रशासनाकडून आजवर 300 रुपये दंड आकारण्यात येत होता. यात वाढ करण्यात आली असून तो दंड 500 रुपये करण्यात आला आहे. 300 नवीन बस खरेदीला मंजुरी पीएमपी प्रशासनाने नवीन 300 बस खरेदीला मंजुरी दिली आहे. यात 200 सीएनजी बस आणि 100 ई-बसचा समावेश आहे. पुणे महापालिका 120 सीएनजी आणि 60 ई-बस खरेदी करून देणार आहे तर पिंपरी चिंचवड महापालिका 80 सीएनजी आणि 40 ई-बस खरेदी करून देणार आहे. ई – कॅबचा निर्णय रद्द शहरात ससेवा पुरविणाऱ्या पीएमपीकडून ई-कॅ खरेदी करून त्यामाध्यमातून प्रवासी वाहतूक सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, प्रशानसाने आता हा निर्णय रद्द केला आहे. पीएमपीने हा निर्णय घेतल्यानंतर चांगलीच चर्चा झाली होती. अखेर हा निर्णय प्रशासनाने रद्द केला.