निवडणूक २०१९ ; काहींनी टाकला बहिष्कार तर, काहींनी केले आवर्जून मतदान

नवी दिल्ली – १७ वी लोकसभा अस्तित्वात येण्यासाठी आज, गुरूवारी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात देशातील १८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघात मतदान  संपन्न झाले. यामध्ये विदर्भातील सात मतदारसंघाचा समावेश होता.

महाराष्ट्रातील संध्याकाळी  ५ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी –

वर्धा -55.66 %, रामटेक –  51.72 %, नागपूर –  53.13 %, भंडारा-गोंदिया –  60.50 %, गडचिरोली-चिमूर – 61.33 %, चंद्रपूर – 55.97% आणि यवतमाळ-वाशीम – 53.97%

संध्याकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी –

अंडमान आणि निकोबार बेटे (1 जागा) – 70.67%, आंध्र प्रदेश (25 जागा) – 66%, छत्तीसगढ (1 जागा) – 56%, तेलंगाना (17 जागा) – 60%, उत्तराखंड (5 जागा) – 57.85%, जम्मू-काश्मीर (2 जागा) – 54.49%,  सिक्किम (1 जागा) – 6 9%, मिझोराम (1 जागा) – 60%, नागालँड (1 जागा) – 78%, मणिपूर (1 जागा) – 78.2%, त्रिपुरा (1 जागा) – 81.8% आसाम (5 जागा) – 68%, पश्चिम बंगाल (2 जागा) – 81%, बिहार – 50.26%, उत्तर प्रदेश – 59.7%, मेघालय – 62%, लक्षद्वीप – 65.9%

सियाचिनमध्ये  तैनात  असलेल्या लष्करी सैन्याने  मतदान केले. यावेळी निवडणूक आयोगाने ऑनलाइन मतपत्रिका  (इ बॅलट्स ) सुविधा प्रदान केली होती.

योग्य रस्ते नसल्यामुळे ओडिशा राज्यातील कालहांडी जिल्ह्यातील भेजीपाडार गावातील रहिवाशांनी आजच्या पहिल्या टप्प्यातील मतदानावर बहिष्कार टाकला .

आंध्रप्रदेश राज्यातील पूर्वी गोदावरी जिल्हा, काकीनाडा येथे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी  आपल्या वृद्ध वडिलांना मतदान केंद्रात नेताना

पश्चिम बंगाल राज्यातील कुचबिहार येथे  महिला जवान वृद्ध महिलेला मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी मदत करताना

बिजनोरमधील एका मतदान केंद्रात नवरदेवाने आपले  मत नोंदविले .

हैद्राबादमध्ये  माजी क्रिकेटपटू आणि तेलंगाना प्रदेश काँग्रेस कमिटी (टीपीसीसी) कार्यकारिणीचे अध्यक्ष मोहम्मद अझरुद्दीन यांनी मतदान केले.

जगातील उंचीने सर्वात छोटी महिला ज्योती आमगे यांनी आज नागपूर मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

हैद्राबाद येथे दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील कलाकार नागा चैतन्य आणि सामंथा, यांनी मतदानाचा आपला हक्क बजावला.

उत्तराखंड हरिद्वारच्या मतदान केंद्रात योग-गुरु रामदेव बाबा यांनी आपले मत दिले.

दिब्रुगढमधील मतदान केंद्रात आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आपले मत दिले.

एआयएमआयएमचे मुख्य आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शहरातील मतदान केंद्रात आपले मत नोंदविले  आहे.

महाराष्ट्र गोंदियातील  ९२ वर्षीय डी एन संघानी यांनी मतदान केंद्रात  जाऊन आपले मत नोंदविले.

बागपत येथील बारात मध्ये मतदान केंद्रावर मतदारांचे स्वागत फुलांचा वर्षाव आणि ढोल संगीत वाजवून करण्यात आला.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.