Sharad Pawar | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा दिला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकांमध्ये देखील प्रचारादरम्यान भाजपकडून याचा उल्लेख केला जात आहे. यावरून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहे. यातच आता शरद पवार यांनी नांदेडमध्ये या घोषणेवरून हल्लाबोल केला आहे.
शरद पवार म्हणाले की, “सत्ताधारी पक्षाची जातीयवादी भूमिका आहे. अर्थात तेच जातीयवादी आहेत हे या घोषणेने अधोरेखित केलं आहे. निवडणूका येतात आणि जातात पण धर्माधर्मात, जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम कुणी करू नये, पण भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना याचे भान नाही. जातीयवादाकडे निवडणूक नेण्यासाठीच योगी आदित्यनाथ यांना आणले जाते,” अशी टीकाही शरद पवार यांनी केली आहे. Sharad Pawar |
उद्धव ठाकरेंनीही या घोषणेवरून भाजपावर एका प्रचारसभेदरम्यान निशाणा साधला होता. भाजपाचे लोक आता ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा देत आहेत. मात्र, आम्ही कुणाला कापूही देणार नाही आणि कुणाला महाराष्ट्र लुटूही देणार नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केली. Sharad Pawar |
अजित पवार काय म्हणाले होते?
भाजपाच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भूमिका स्पष्ट केली होती. योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेला महाराष्ट्रातील जनता स्वीकारणार नाही असं थेट उत्तर अजित पवारांनी दिले आहे. महाराष्ट्रातील लोकांनी सातत्याने जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे बाहेरचे लोक येतात, त्यांचा विचार करून बोलून जातात. परंतु महाराष्ट्रातील लोकांनी हे मान्य केले नाही. हा आजवरचा महाराष्ट्रातील निवडणुकांचा इतिहास असल्याचे अजित पवार म्हणाले होते.
हेही वाचा:
खळबळजनक ! भाजपचे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या