बारामती – बारामती पंचायत समितीच्या सभापती पदी नीता नारायण फरांदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार ही निवड झाली.
बारामती पंचायत समितीच्या सभापती पदासाठी नीता फरांदे (मुरूम ता. बारामती) यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.
मावळते सभापती निता बारवकर यांनी निता फरांदे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, उपसभापती प्रदीप धापटे, सोमेश्वर कारखाना माजी चेअरमन राजवर्धन शिंदे,तालुका सोशल मिडियाचे अध्यक्ष सुनिल बनसोडे, पंचायत समिती सदस्य राहुल भापकर, संजय भोसले, रोहित कोकरे ,राहुल झारगड, सदस्या अबोली भोसले,शारदा खराडे, मेनका मगर,लिलावती गावडे,तालुका पदाधिकारी,मावली कदम, गौतम काकडे, शब्बीर शेख, सोमनाथ कदम आदी उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विजय पाटील तसेच गटविकास अधिकारी राहुल काळभोर पंचायत समितीचे अधिकारी,कर्मचारी आदी उपस्थित होते.