– दोन दिवसांत लेखी उत्तर देण्याचे निर्देश
मुुंबई – शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिकाचे कार्यकारी संपादक व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस जारी केली आहे. या संदर्भात आयोगाने 3 एप्रिलपर्यंत खुलासा करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिले आहेत.
संजय राऊत यांनी रविवार, 31 मार्च रोजीच्या दैनिकामधील रोखठोक या सदरात ‘ईव्हिएमचा घोटाळा बेगुसरायामध्ये झाला तरी चालेल’… असा उल्लेख केला आहे. हे वाक्य निवडणूक प्रक्रियेतील ईव्हिएमच्या वापराबाबत अविश्वास दर्शविणारा असून निवडणूक प्रक्रियेविषयी गढूळ वातावरण निर्माण करणारे तसेच आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारे असल्याने मुंबई शहराचे जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी राऊत यांना आज नोटीस जारी केली आहे. या नोटीसीसंदर्भात 3 एप्रिल रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत खुलासा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.