पुणे -राष्ट्रवादी काँग्रेसने गुरूवारी (25 मार्च) ‘लोकसभा निवडणूक २०१९’ साठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. राष्ट्रवादीचा जाहीरनामा घोषित करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. मात्र ही पत्रकार सरकारी बंगल्यात आयोजित करण्यात आली होती. आचारसंहितेते सरकारी संपत्तीचा वापर करता येत नाही.
याच कारणामुळे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.याप्रकरणी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार ए वाॅर्ड अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे.