राम कपूरने केलेल्या ‘त्या’ विधानानंतर एकता कपूर संतापली; म्हणाली…

Ekata Kapoor | अभिनेता राम कपूरची ‘बडे अच्छे लगते है’ ही मालिका खूप गाजली. या मालिकेत तब्बल १७ मिनिटांचा बोल्ड सीन दाखवला गेला होता. ज्यानंतर या मालिकेवर टीका करण्यात आली होती. मात्र राम कपूरने या सीनसाठी तयार नव्हता, एकता कपूरनं जबरदस्ती केल्यानं तो सीन करावा लागल्याचं एका मुलाखतीदरम्यान म्हंटले. या शोची निर्मिती एकताने केली होती. मात्र यानंतर एकताने सोशल मिडियावर नाव न घेता राम कपूरवर निशाणा साधला आहे.
एकताने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत राम कूपरला सुनावलं आहे. एकतानं एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. ‘ माझ्या शोबद्दल मुलाखतीत नको बोलणाऱ्या आणि प्रोफशनल अभिनेत्याला तोंड बंद ठेवायला हवं. चुकीची माहिती आणि खोटे किस्से, कधी पर्यंत सुरू राहतील या गोष्टी, मी बोलते, पण शांत राहण्यातच मोठेपणा असतो, असं एकतानं म्हटलंय. यावरून एकता राम कपूरवर प्रचंड संतापल्याचं दिसून येतंय. विशेष म्हणजे एकताची ही पोस्ट राम कपूरच्या मुलाखतीच्या एका दिवसानंतर आली आहे.Ekata Kapoor |
राम कपूर म्हणाले, ‘एक अभिनेता म्हणून माझे काम माझे काम करणे आहे. मला कोणाला समजावण्याची गरज नाही. माझे काम स्क्रिप्टचे पालन करणे आहे. मी हे करू शकत नाही असे कसे म्हणू, मग मी मुख्य अभिनेता नाही. त्यामुळे मी काही चुकीचे केले नाही. एकताने स्वतः हा सीन लिहिला होता, तिला आपण हा सीन करायचा होता. मी एकताला म्हणालो, ‘तुला याची पूर्ण खात्री आहे का? टेलिव्हिजनमध्ये यापूर्वी असे कधीच घडले नव्हते, ही खूप मोठी गोष्ट आहे. तीन पिढ्या एकत्र हा शो बघतात.’
पण एकताला आत्मविश्वास होता की तिला हे करायचं होतं. मी म्हणालो, ठीक आहे, मी आधी माझ्या बायकोकडून ग्रीन सिग्नल घेईन. मग मी साक्षीला म्हणालो, तुला काही अडचण असेल तर मला सांग. मी एकतासोबत बोलेन.’ दरम्यान, राम कपूर आणि साक्षी शो ‘बडे अच्छे लगते हैं’चा प्रीमियर 2011 मध्ये झाला होता. या शोमध्ये राम कपूर आणि साक्षी तन्वर यांनी राम आणि प्रियाची भूमिका साकारली होती.






