Ganesh Naik On Eknath Shinde | महायुतीमधील वाद सातत्याने समोर येत आहेत. याचदरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याची देखील चांगलीच चर्चा झाली होती. यानंतर आता राज्याचे वनमंत्री तथा भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंबाबत मोठे भाष्य केले आहे. ‘एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली, पण कमावलेलं टिकवता आलं पाहिजे,’ असा टोला त्यांनी लगावला आहे. पालघर जिल्ह्यातील दुर्वेश येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत व कर्मचारी निवासस्थानाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी गणेश नाईक बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार डॉ. हेमंत सावरा देखीला उपस्थित होते. काय म्हणाले गणेश नाईक ? नाईक म्हणाले, “पालघरसह एकत्रित असलेल्या ठाणे जिल्ह्याचा मी पालकमंत्री राहिलो होतो. त्यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा यांचे वडील विष्णु सवरा, खासदार चिंतामण वनगा हे देखील जिल्हा नियोजनाच्या बैठकीत असायचे. विद्यमान उपमुख्यमंत्री आणि तेव्हाचे आमदार एकनाथ शिंदे हे सुद्धा त्या जिल्हा नियोजनच्या बैठकीत असायचे. मात्र एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली, प्रत्येकाच्या नशिबाचा खेळ आहे.” Ganesh Naik On Eknath Shinde | ‘कसे टिकवता यावर जनसामान्यांची नजर असते’ पुढे ते म्हणाले, “प्रत्येकालाच लॉटरी लागते असे होत नाही, एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली याचा मला आनंद आहे. पण प्रत्येकाला कमावलेलं टिकवता आलं पाहिजे. किती कमावलं, कसं कमावलं यापेक्षा ते टिकवणे महत्त्वाचे आहे कसे टिकवता यावर जनसामान्यांची नजर असते,” असे सूचक विधान गणेश नाईकांनी केले. Ganesh Naik On Eknath Shinde | हेही वाचा : Priya Berde : “माझ्या दंडाला चिमटे काढले… हातातल्या अंगठ्या काढण्याचा प्रयत्न…”; अभिनेत्री प्रिया बेर्डेंनी सांगितला चाहत्यांचा धक्कादायक अनुभव