एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेणार? गृहखात्याऐवजी दोन महत्त्वाची खाती मिळण्याची शक्यता

Eknath Shinde | महाराष्ट्रातील नव्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. त्यानुसार आता काऊंटडाऊन सुरू झाले असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी मुंबईतील आझाद मैदानावर सुरु आहे. तर दुसरीकडे अद्याप गृहमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे.
एकनाथ शिदें यांनी गृहमंत्रीपदावर दावा केला. तर भाजपकडून गृहमंत्रिपदाचा दावा सोडणार नसल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. त्यातच काल संध्याकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक महत्त्वाची बैठक वर्षा निवासस्थानी पार पडली. या बैठकीत गृहमंत्रिपदावर चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. जवळपास 40 ते 45 मिनिटं ही बैठक चालली. या बैठकीनंतर गृह खातं देवेंद्र फडणवीसांकडेच राहणार असल्याचं सूत्रांच्या माहितीनूसार समोर आलं आहे.
एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद?
भाजपकडून एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद दिले जाणार आहे. तसेच नगरविकास खात्यासह अजून एक खातं घ्यावं, असा प्रस्वात भाजपकडून शिंदे यांच्या समोर ठेवण्यात आला आहे. परंतु अद्याप यावर कोणतेही शिक्कामोर्तब झालेले नाही. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काल झालेल्या बैठकीत देखील मंत्रिपदावर देखील अंतिम तोडगा निघाला नसल्याचं कळतंय. त्यामुळे आज पुन्हा एकदा बैठक होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे उद्या शपथविधी असताना आजतरी मंत्रिपदाचा प्रश्न सुटणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार आहे. भाजप केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. त्यानंतर भाजपकडून मुख्यमंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:





