Eknath Shinde | Uddhav Thackeray | Lok Sabha Election 2024 : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. लोकसभा निवडणूक 7 टप्प्यात घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. लोकसभेच्या 543 जागांवर मतदान होणार आहे.
पहिला टप्पा 19 एप्रिल, दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मे, पाचवा टप्पा 20 मे, सहावा टप्पा 25 मे, सातवा टप्पा 1 जूनला होणार आहे. तर 4 जूनला निकाल लागणार आहे.
महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे पर्यंत पाच टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे या पाच टप्प्यात मतदान होणार आहे. । Eknath Shinde | Uddhav Thackeray | Lok Sabha Election 2024
त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली असून, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील होताना दिसत आहे. अश्यातच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना चांगलाच टोला लगावला आहे.
आज नागपूर येथील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांशी एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “राजू पारवे यांच्यासाठी डॅाक्टरांनी सहकार्य केलं. मी कोरोना झालेला डॉक्टरांना भेटण्यासाठी गेलो होतो, तेव्हा त्यांना धीर दिला.
कोरना काळात डॉक्टरांनी देवदुताप्रमाणे काम केलं. मी डॅाक्टर नसलो तरी दीड वर्षांपूर्वी मोठं ॲापरेशन केलं. काही लोकांचे कमरेचे आणि गळ्याचे पट्टे उतरवून टाकले”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
एकनाथ शिंदे म्हणाले, खासदार कृपाल तुमाने यांना खासदारापेक्षा मोठा मान देणार आहे. लोकांना मदत करतांना कधी कधी डॉक्टरांना पैसे कमी करायला सांगावे लागले. कधी कधी आम्ही आमच्या खिशात हात घातले.
डॉक्टर संघटनेच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी कृपाल तुमाने यांचे तोंड भरून कौतुक केलं. रुग्णालयतील अडचणी आम्ही कोरोना काळात दूर केल्या. जे डॉक्टर टेंशमध्ये होते तेही मला भेटलेय.
ते पुढे म्हणाले की, डॉक्टर हा समाजाचा आधारस्तंभ आहे. जीवनदान देणारे परमेश्वराचे रुप म्हणजे डॉक्टर आहेत. कोणताही डॉक्टर पेशंट आपल्या घरी सुखरुप जावा, यासाठी प्रयत्न करत असतो. पैसे कमी करायला सांगितले तर डॉक्टर आवडीने करतो. कारण त्यांना माहिती आहे, हे खिशातून पैसे देतील.
कोविडमध्ये अनेक डॉक्टरांचा मृत्यू झाला. डॉक्टर देण्याच्या अगोदर पेशंटच म्हणायचा रेमेडेसिवीर द्या. मी कोरोना काळात खूप फिरलो. मी थोडे दिवस आरोग्यमंत्री होतो, तेव्हा दुर्गम भागात गेलो. प्रत्येक ठिकाणी भेट दिली. तिथेही डॉक्टर लोक चांगलं काम करतात. ऑर्थोपिडिक सर्जन खूप आहेत, असंही एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं. । Eknath Shinde | Uddhav Thackeray | Lok Sabha Election 2024