Eknath Shinde : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाल्याची माहिती आहे.Eknath Shinde यावेळी शिवसेना (शिंदे गट) खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या विधानावरून शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला. “उद्धव ठाकरे विधानपरिषदेसाठी फोन केला तर मदत करणार का?” असा सवाल पत्रकारांनी केला असता, शिंदे यांनी हसत उत्तर दिले, “राज्यसभेची निवडणूक झाली आहे. आता विधानपरिषदेची निवडणूक येईल, तेव्हा बघू.” त्यांच्या या उत्तरामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. Eknath Shinde Eknath Shinde दरम्यान, पंतप्रधान मोदींसोबतची भेट ही सदिच्छा भेट असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. “मी अधिवेशनादरम्यान खासदारांना भेटण्यासाठी दिल्लीला येत असतो. काल आमच्या खासदारांना भेटलो, आज पंतप्रधान मोदी आणि लोकसभा अध्यक्ष Om Birla यांची भेट घेतली,” असे ते म्हणाले. Eknath Shinde तसेच, “कोण काय बोलतंय याकडे लक्ष न देता मी माझं काम करत असतो. विरोधक टीका करत राहतात, पण मी कामातून उत्तर देतो,” असेही शिंदे यांनी सांगितले. इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व पक्षांनी एकसंघ राहणे आवश्यक असल्याचेही त्यांनी मोदींसमोर मांडल्याचे सांगितले.Eknath Shinde