एकनाथ शिंदेंचे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात? ; मुख्यमंत्र्यांना सर्वात मोठा धक्का

Eknath Shinde group । देशासह महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक निकालांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. राज्यातील जनतेनं महायुतीतला नाकारून महाविकास आघाडीच्या पदरात मोठे यश पाडले आहे. या निकालात महायुतीला राज्यात अवघ्या 17 जागा मिळाल्या आहेत, तर महाविकास आघाडीचा 31 जागांवर विजय झाला आहे. मात्र आता या निकालानंतर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लोकसभेच्या निवडणूक निकालांनंतर राज्यातील काही राजकीय समीकरणं बदलण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिंदेंचे काही आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिंदेच्या सहा आमदारांचा उद्धव ठाकरेंशी संपर्क Eknath Shinde group ।
लोकसभा निवशिंदे गटाच्या सहा आमदारांडणुकी दरम्यान आणि लोकसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना शिंदे गटाच्या सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आलीय. पक्ष फुटीनंतर ज्या आमदारांनी शिवसेना ठाकरे गटावर टोकाचा विरोध करणं टाळलं किंवा ठाकरेंच्या विरोधात कुठल्याही प्रतिक्रिया न देता शिवसेना शिंदे गटात राहूनसुद्धा तटस्थ भूमिका ठेवली, अशा आमदारांचा ठाकरे गटात प्रवेश होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.
एनडीएला धक्का देण्याची तयारी ? Eknath Shinde group ।
दरम्यान, उद्धव ठाकरे इंडिया आघाडी सरकार स्थापन करण्याबाबत गंभीर आहेत. महाराष्ट्रात काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यात लोकसभेत इंडिया आघाडीने ज्या प्रकारे मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे शिंदे यांच्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. गरज पडल्यास उद्धव शिंदेंच्या खासदारांना फोडून एनडीएला धक्का देऊ शकतात. याआधी मंगळवारी शरद पवार यांनी जेडीयू आणि टीडीपीशी संपर्क साधल्याचा दावा करण्यात आला होता.
विशेष म्हणजे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमत मिळाले आहे. मात्र, यावेळी अनेक राज्ये अशी होती जिथे एनडीए आणि भाजपची कामगिरी फारशी चांगली नव्हती. त्यापैकी एक राज्य म्हणजे महाराष्ट्र. याठिकाणी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीचाही समावेश असलेल्या राज्य पातळीवर स्थापन झालेल्या महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या आहेत. यामध्ये भाजपला 9, शिवसेनेला 7 तर राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपैकी निम्म्याहून अधिक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत.





