Eknath Shinde : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये (Eknath Shinde) भाजपला राज्यात सर्वाधिक यश मिळाले असून, तो एकटाच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट) लाही चांगली कामगिरी करता आली असून, राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने (Eknath Shinde) युती करून निवडणूक लढवली होती. राज्यात भाजपने एकट्याने बहुमत मिळवले असले तरी अनेक महापालिकांमध्ये त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. अशा परिस्थितीत शिवसेना शिंदे गटाची बार्गेनिंग पावर वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, प्रत्यक्षात काही ठिकाणी उलटच चित्र दिसत आहे. ठाणे महापालिका ही शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानली जाते. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने ७५ नगरसेवक निवडून आणले असून, भाजपला फक्त २८ नगरसेवक मिळाले आहेत. अशा स्पष्ट बहुमतासह ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचाच महापौर होईल, अशी चर्चा रंगली होती. भाजपने सुरुवातीला महापौरपदासाठी दोन वर्षांचा हट्ट धरला होता आणि अन्यथा विरोधात बसण्याची भूमिका घेतली होती. मात्र, अखेर दोन्ही पक्षांमध्ये सत्तावाटपाचा समझोता झाला आहे. Eknath Shinde समजोत्यानुसार, ठाणे महापालिकेत ‘सव्वा-सव्वा वर्ष’ फॉर्म्युला ठरला आहे. पहिले सव्वा वर्ष महापौरपद शिवसेना शिंदे गटाकडे राहील, तर नंतरचे सव्वा वर्ष भाजपकडे जाईल. यानुसार, महापौरपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून शर्मिला पिंपळोलकर यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. तर उपमहापौरपदासाठी भाजपकडून कृष्णा पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याने, शर्मिला पिंपळोलकर ठाण्याच्या नव्या महापौर म्हणून आणि कृष्णा पाटील उपमहापौर म्हणून निवडल्या जाण्याची शक्यता निश्चित मानली जात आहे. अधिकृत घोषणा लवकरच होणार असून, येत्या काही दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या फॉर्म्युल्यानुसार, ठाणे महापालिकेत ५ वर्षांच्या कालावधीत ४ महापौर आणि ४ उपमहापौर मिळणार आहेत, ज्याची राज्यभर चर्चा सुरू आहे. सुरुवातीला भाजपने ठाण्यातील आपल्या ताकदीचा फायदा घेऊन अधिक कालावधी मागितला होता, मात्र अखेर सत्तेत सहभागी राहण्यासाठी त्यांनी उपमहापौर पद स्वीकारले. एकनाथ शिंदे यांनी कोपरी परिसरातील शर्मिला पिंपळोलकर यांच्यावर पुन्हा विश्वास टाकला असून, त्यांच्या सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकण्याच्या पार्श्वभूमीवर हे निर्णय घेतले गेले आहेत. हा समझोता महायुतीतील (भाजप-शिवसेना शिंदे गट) संबंध दर्शवतो, ज्यात ठाण्यात शिंदे गटाचे वर्चस्व कायम राहताना भाजपला सत्तेत सामील करून घेण्यात आले आहे. हे पण वाचा : Gold Silver Rates : मोठी घसरण! चांदी एका झटक्यात 60,000 रुपयांनी स्वस्त, तर सोने 10,000 रुपयांनी कोसळले