Eknath Khadse: शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील मानपूर येथील एका जमीन खरेदी प्रकरणी त्यांच्यावर तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसे यांच्या विरोधात बोदवड पोलीस ठाण्यामध्ये फसवणूक आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एकनाथ गणपत खडसे, शारदा एकनाथ खडसे, खडसे यांचे प्रतिनिधी सुधाकर पाटील तसेच बोदवड येथील दुय्यक निबंधक कार्यालयातील तत्कालीन अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. काय आहे नेमकं प्रकरण? 2002 मध्ये मानपुर शिवारातील महार वतनाची गट क्रमांक 122 असलेली जमीन खरेदी करण्यात आली होती. ही जमीन साखर कारखाना उभारण्याच्या नावाखाली खरेदी केल्याचे सांगण्यात आले आहे. चमेलीबाई तुकाराम तायडे (८२) यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार, त्यांच्या नावावर २००२ मध्ये ‘सरकारी वर्ग-दोन’ची शेतजमीन होती. तक्रारदाराच्या मते, एकनाथ खडसे यांनी मूळ मालक चमेली बाई तुकाराम तायडे यांच्या वारसांना चांगला आर्थिक मोबदला देण्याची तसेच साखर कारखान्यात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. Eknath Khadse Weather alert : पुढील 24 तासात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता; कुठे येलो तर कुठे अॅारेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्याला कोणता इशारा? वाचा.. एकनाथ खडसे यांच्याकडून तायडे कुटुंबाला 51 हजार रुपये देण्यात आले. यानंतर सर्वांचे कागदावर अंगठे घेऊन बोदवड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीची खरेदी करण्यात आली. यानंतर राहिलेल्या पैशांसाठी अनेकदा पाठपुरावा करून देखील या कुटुंबाला देण्यात आलेला नाही, असा आरोप आहे. दरम्यान, जानेवारी २००२ मध्ये हा व्यवहार सुधाकर पाटील यांच्या माध्यमातून बोदवड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात पूर्ण झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. Eknath Khadse अनेक वर्ष उलटून देखील मानपूर शिवारातील गट क्रमांक 122 या जागेवर साखर कारखाना उभारण्यात न आल्याचे पाहून तायडे कुटुंबाचे 2025 साली याबाबत माहिती घेतली असता त्यांना ही जमीन शारदा एकनाथराव खडसे यांच्या नावाने करण्यात आल्याचे दिसून आले. यामुळे तायडे यांनी रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली. यानंतर रिपाई पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली. Eknath Khadse एकनाथ खडसे काय म्हणाले? एकनाथ खडसे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळत खोट्या तक्रारींच्या आधारे दाखल झालेल्या या गुन्ह्याविरोधात आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. खडसे म्हणाले की, “बोदवड पोलीस ठाण्यात माझ्यावर राजकीय सूडबुद्धीने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वास्तविक या व्यवहाराचा आणि माझा दुरान्वयेही संबंध नाही. मी हा व्यवहार केलेला नाही किंवा या व्यवहाराचा माझा संबंध नाही. माझ्या मुलीने ही जमीन घेत असताना ही वर्ग 1 ची जमीन आहे म्हणून ती जमीन घेतलेली आहे. त्याचा सातबारा वर्ग 1 च आहे. तो खासगी व्यवहार असून, ही जमीन महार वतनाची नसून १०१ वर्गवारीची आहे”, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. “विधीमंडळात ज्यावेळेस हा प्रश्न विचारला गेला, त्यावेळी महसूल मंत्र्यांनी सांगितलं आहे की, जमीन वर्ग एक आहे. पण साताबाऱ्याचा उताऱ्यावर महार वतनाची जमीन सांगण्यात येऊन शासनाची दिशाभूल करुन हा FIR केलेला आहे. या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी केल्या गेल्या असताना चमेली बाई तायडे यांचीच 25 वर्षांनंतर तक्रार का?”, असा सवालही एकनाथ खडसे यांनी केला आहे. Eknath Khadse हेही वाचा: Kharadi Accident : खराडीत काळाचा घाला! भरधाव वाहनाच्या धडकेत तरुण दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू