Ek Din Release Date: बॉलिवूडमधील आगामी रोमँटिक चित्रपट एक दिन चा दुसरा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी कथा यात पाहायला मिळत आहे. या चित्रपटात जुनैद खान आणि साई पल्लवी ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. ट्रेलरमध्ये एकतर्फी प्रेम, भावनिक संघर्ष आणि अधुरी राहिलेली प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. ट्रेलरची सुरुवात एका साध्या ऑफिस लाईफपासून होते. जुनैद खानच पात्र एक शांत, थोडा अबोल आणि आपल्या भावना व्यक्त न करणारा युवक आहे. तो आपली सहकारी मीरा म्हणजेच साई पल्लवीवर प्रेम करतो, पण तिला कधीच आपल्या भावना सांगू शकत नाही. तिच्याकडे दूरून पाहणं आणि मनातच तिच्यासोबत आयुष्याची स्वप्नं पाहणं, एवढंच त्याचं जग असतं. Ek Din Release Date कथेतील मोठा ट्विस्ट तेव्हा येतो, जेव्हा ऑफिसमधील सगळे कर्मचारी कामानिमित्त जपानला जातात. तिथे मीराचा अपघात होतो आणि तिला “ट्रांझिएंट ग्लोबल अॅम्नेशिया” नावाचा आजार होतो. या आजारामुळे काही काळासाठी तिची स्मरणशक्ती हरवते. विशेष म्हणजे, या अवस्थेत तिला फक्त जुनैदचं पात्र आठवत राहतं, कारण त्यानेच तिचा जीव वाचवलेला असतो. (Ek Din Release Date) Ek Din Trailer डॉक्टर सांगतात की ही अवस्था फक्त एका दिवसासाठीच असेल आणि त्यानंतर मीरा सगळं विसरणार आहे. ही गोष्ट माहीत असूनही जुनैद तिच्यासोबतचा तो एक दिवस खास बनवण्याचा प्रयत्न करतो. त्या एका दिवसात दोघेही अनेक सुंदर क्षण अनुभवतात, एकमेकांशी भावनिकरित्या जोडले जातात. मात्र, हे नातं फक्त एका दिवसापुरतंच मर्यादित आहे, ही जाणीव ट्रेलरला अधिक भावनिक बनवते. एकतर्फी प्रेम, अधुरी राहणारी भावना आणि त्या एका दिवसाचं महत्त्व यामुळे कथा अधिक खोल आणि हळवी वाटते. Ek Din Release Date जुनैद खान आणि साई पल्लवी यांची केमिस्ट्री ट्रेलरमध्ये खूपच प्रभावी दिसते. दोघांनीही आपल्या भूमिकांना न्याय दिला असून, प्रेक्षकांना ही जोडी नक्कीच आवडेल, असा अंदाज आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुनील पांडे यांनी केलं आहे, तर निर्मिती आमिर खान आणि मंसूर खान यांनी केली आहे. हा भावनिक रोमँटिक चित्रपट 1 मे 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे एका वेगळ्या आणि मनाला भिडणाऱ्या प्रेमकथेचा अनुभव घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.