जिल्ह्यात आणखी आठ बाधितांचा मृत्यू

सातारा -जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात आठ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात “पॉझिटिव्हिटी रेट’ सात टक्क्यांच्या आत असताना, दुसऱ्या बाजूला करोनाबळी सुरुच आहेत. करोनामुळे रोज आठ ते दहा रुग्णांचा मृत्यू होत आहे. हे करोनाबळी थांबणार कधी, याची चिंता जिल्हावासीयांना लागली आहे. करोनाबळींची एकूण संख्या आता 1618 झाली आहे.
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचार सुरू असताना विटा, ता. खानापूर (जि. सांगली) येथील 39 वर्षीय पुरुष, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना नेर, ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, पाटण येथील 85 वर्षीय पुरुष, बोरखळ, ता. सातारा येथील 71 वर्षीय पुरुष, सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव येथील 72 वर्षीय पुरुष, पाटखळ माथा, ता. सातारा येथील 67 वर्षीय पुरुष, विसापूर, ता. खटाव येथील 72 वर्षीय पुरुष, कळंबे, ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष, अशा एकूण आठ कोविडबाधितांचा मृत्यू झाल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.





