कोळवाडी येथे मिनी बस व इर्टीगाच्या अपघातात आठ जखमी, दोन लहान मुले व एका महिलेची प्रकृती चिंताजनक.

ओतूर | कोळवाडी ता. जुन्नर गावच्या हद्दीत नगर-कल्याण मिनी बस व इर्टीगा कारचा खड्डे चूकवताना अपघात होऊन या अपघात आठ प्रवासी जखमी झाले आहे. यात दोन लहान मुले व एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.
कोळवाडी बसथांब्या पुढे नगर-कल्याण महामार्गावर असलेल्या वळणावर खड्डे चुकवताना सदर अपघात सकाळी साडेसातच्या सुमारास घडला. ठाणे कडून धार्मिक कामासाठी माळशेज मार्ग आळेफाटा बाजूला येत असलेल्या इर्टीगा कारचा व आळेफाटा येथून प्रवासी घेऊन चाललेल्या मिनी बसचा कोळवाडी गावच्या हद्दीत समोरा समोर अपघात झाला. या अपघातात एकूण आठ व्यक्ती जखमी झाले आहे.
पिंटू शिंदे (वय ३५), सुमन शिंदे (वय ५०) व इतर जखमींची नावे समजू शकली नाही. हे सर्व सध्या राहणार ठाणे येथील असून ते धार्मिक विधीसाठी कासार शिरूर (ता. बीड) येथे गावी चालले होते.
रुग्णवाहिका चालक दिपक मंडलीक, कुणाल डुंबरे, गणेश आमले, दत्ता शिंदे यांनी त्वरीत रुग्णवाहिका हजर करून जखमीना उपचारासाठी आळेफाटा येथील खाजगी दवाखान्यात नेले. याप्रसंगी स्थानिक युवक महेंद्र सस्ते, विशाल सस्ते, ऋतुराज कुमकर, बाबू कुमकर, अक्षय कुमकर, निलेश कुमकर, राजेश कोकणे, सोमनाथ चौधरी, महेश सस्ते, राहुल सुकाळे व ओतूर पोलीस कर्मचाऱ्यांनी जखमीना मदत केली आणि महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतुक सुरळीत केली.





