कोपरगाव गोळीबार प्रकरणात आठजण ताब्यात; गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दोन गटांने एकमेकांवर केला गोळीबार

कोपरगाव : कोपरगाव शहरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या गोळीबारातील आठ आरोपींना पोलिसांनी गजाआड केले. दोन्ही गटांतील आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची असल्याने पूर्व वैमनस्यातून गोळीबार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पूर्व वैमनस्यातून गुरुवारी एकमेकांवर गोळीबार केला आहे. दोन्ही गटांने एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्या असल्याने दोन्ही गटातील आठजणावर कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
नाजिम ईस्लाउद्दीन शेख (रा.गांधीनगर, कोपरगाव) याच्या फिर्यादीवरून तन्वीर रंगरेज (रा संजयनगर), दादा मोरे (रा. राहाता), शाहरुख शेख (रा. श्रीरामपूर), रवि बनसोडे (रा. शिर्डी), अमर भोसले (रा.लोणी) व बाळू पगारे (रा. शिंगवे) अशा सहाजणाविरूध गोळी झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपी दादा मोरे, रवी बनसोडे, बाळू पगारे,अमर भोसले या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गोळीबारात जखमी असलेला आरोपी तन्वीर रंगरेज हा नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे
दुसऱ्या गटातील रामनाथ उर्फ दादा गोरख मोरे (रा. पिंपळवाडी, राहाता) याने दिलेल्या फिर्यादीवरून नाझिम शेख, इजाज मणियार, सागर मंजुळ, अजहर शेख (सर्व रा. कोपरगाव) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. त्यांनी गोळी झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार केल्याने शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी नाझिम इस्लाउद्दीन शेख, ईजाज अन्सार मणियार, सागर उर्फ मोद्या रामदास मंजुळ, अझर इस्लाउद्दीन शेख यांना ताब्यात घेतले आहे.
यासंदर्भात पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांनी म्हणाले की, दोन्ही गटातील आरोपी यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची असल्याने पूर्व वैमनस्यातून एका गटातील नाझिम शेख याने गावठी कट्ट्यातून गोळीबार करून तन्वीर रंगरेज याला जखमी केले तर दुसऱ्या गटातील दादा मोरे याने गोळीबार केला आहे. दोन्ही गटातील आरोपींना पकडण्यात आले असून, त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदा हत्यार बाळगणे व इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच या दोन्ही गटातील गुन्हेगारांना कोणी हत्यार पुरवले व त्यांचे इतर कोण साथीदार आहेत, याचा शोध पोलीस घेत आहे.





