“अहंकारामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ग्रहण लागले”; सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टींवर टीका

Sadabhau Khot Vs Raju Shetty | स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून रविकांत तुपकरांची हकालपट्टी करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दीर्घकाळ सांभाळलेले रविकांत तुपकर यांना संघटनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यामुळे राजू शेट्टी यांच्यावर टीका होत आहे.
यावर आता विधान परिषदेचे आमदार आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर निशाणा साधला आहे. राजू शेट्टींच्या अहंकारामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ग्रहण लागल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
आत्मपरीक्षण राजू शेट्टी यांनी करावे
आमदार सदाभाऊ खोत म्हणाले की, “शेतकरी चळवळ टिकली पाहिजे. ते शेतकऱ्यांसाठी महत्वाचं आहे. मात्र, त्यांच्या स्वत:च्या अहंकारामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सध्या ग्रहण लागले आहे. या आत्मपरीक्षण खऱ्या अर्थाने शेट्टी यांनी करायला पाहिजे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाने अजूनही विचार करावा आणि शेतकऱ्यांसाठीची ही चळवळ एकत्र कशी राहील, यासाठी प्रयत्न केला पाहिजे.”
पुढे ते म्हणाले, “स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये उल्हासदादा पाटील मी स्वत: किंवा शिवाजीराव माने, रविकांत तुपकरांसारखे यांसारख्या नेतेमंडळींची मोठी यादी आपल्याला पाहायला मिळेल.ही सर्व लोकं आपल्या घरची भाकर खाऊन, घरादारांवर तुळशीपत्र ठेऊन,बाहेर 10 ते 15 वर्षे काम करत राहिले आहे. तरीही अशा माणसांना अपमानित करणं योग्य नाही,” अशी टीका विधान परिषदेचे आमदार खोत यांनी केली आहे.
रविकांत तुपकरांची हकालपट्टी
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर आरोप केल्यानंतर रविकांत तुपकरांबाबत निर्णय घेण्यासाठी संघटनेकडून समिती नेमली होती. या समितीकडून तुपकरांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून थेट हकालपट्टी करण्यात आली. Sadabhau Khot Vs Raju Shetty |
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात भूमिका घेऊन संघटनेची हानी केल्याचा आरोप रविकांत तुपकर यांच्यावर करण्यात आला. याच आरोपाच्या पार्श्वभूमीवर त्यांची हकालपट्टी करण्यात येत असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगण्यात आले आहे. Sadabhau Khot Vs Raju Shetty |
हेही वाचा:
ममता बॅनर्जींच्या बांगलादेशविषयी केलेल्या टिप्पणीवर सर्वस्तरातून टीका ; बांगलादेशनेही घेतला आक्षेप





