पुणे : जेजुरी नगरपरिषदेची ५ किलोमीटरपर्यंत हद्दवाढ करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू ,असे प्रतिपादन नगराध्यपदाचे उमेदवार जयदीप बारभाई यांनी केले. जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेजुरी शहरातील विविध प्रभागातील मतदारांच्या भेटीगाठी दरम्यान जयदीप बारभाई यानी वरील प्रतिपादन केले. जयदीप बारभाई पुढे म्हणाले की, जेजुरी शहरातील नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषदेचे वार्षिक बजेट आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि जेजुरी शहरालगत असलेल्या दोरगेवाडी,कुंभारकरवस्ती दवणेमळा स्टेशन परिसर, माऊलीनगर, कोळेकर वस्ती, जेजुरी एमआयडीसी परिसर इत्यादी ठिकाणीच्या नागरिकांना नगरपालिकेकडे किंवा कोणत्याही ग्रामपंचायतीकडे ना घराची नोंदणी ना सात बारा उतारा यावर नोंद नसल्याने बँक कर्ज योजना घरकूल योजना, रस्ते गटार पाणीपुरवठा योजना त्याबरोबर इतर योजना मिळत नाही. त्यामुळे तरुण पिढी ही नैराश्यमय जीवन जगताना पहावयास मिळते. नगरपरिषदेच्या माध्यमातून सोयीसुविधा उपलब्ध करून देताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जेजुरी नगरपरिषदेची हद्दवाढ करणे आवश्यक आहे. या भागातील नागरिक मतदार असूनही भौतिक सुविधांची वानवा आहे. हा भाग नगरपरिषद हद्दीत नाही. त्याबरोबर नगरपरिषदेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी मदत होईल. घन प्रकल्पामुळे उत्पन्न वाढेल… जेजुरीचा घन प्रकल्प हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून त्यासाठी एमआयडीसी परिसरात जागा उपलब्ध करून त्यावर बायोमायनिंग प्रकल्प राबविण्यात येईल आणि त्या माध्यमातून नगरपालिकेचे उत्पन्नात वाढ होण्यासाठी मदत होईल.असे आश्वासन नगराध्यपदाचे उमेदवार जयदीप बारभाई यांनी सांगितले. जेजुरी नगरपरिषदेचे वार्षिक अंदाजपत्रकात 150कोटींची वाढ करण्याचा प्रयत्न करणार.