पुणे : राजमाता जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्षम माजी नगरसेविका सुजाता सदानंद शेट्टी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महापालिकेच्या माध्यमातून सुजाता शेट्टी आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी मंगळवार पेठ, सोमवार पेठ, तसेच परिसरात केलेल्या विकासकामांची दखल घेत समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. या वेळी राहुल तांबे, मंगेश साखरे या वेळी उपस्थित होते. राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी कर्तृत्वान महिला व आदर्श मातांचा सन्मान केला जातो. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमास सुजाता सदानंद शेट्टी यांनी भेट दिली. या वेळी त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सुजाता शेट्टी या प्रभाग क्रमांक २४ ( ब ) मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असून, सर्व स्तरातून त्यांना प्रतिसाद मिळत आहे. आज जोरदार शक्तिप्रदर्शन सुजाता सदानंद शेट्टी यांच्या प्रचारार्थ आज (मंगळवारी) प्रभागात जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. प्रभाग क्रमांक २४ चे पॅनल प्रमुख सदानंद शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण प्रभागात दुचाकी फेरी काढली जाणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून सदानंद शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली या प्रभागात प्रचारात सुजाता शेट्टी यांनी आघाडी घेतल्याचे प्रभागात चित्र असून, त्यांना मतदारांकडून भरघोस मते मिळतील, अशी चर्चा प्रभागात आहे.