वाबळेवाडी शाळेला शिक्षणमंत्री भेट देणार

ओजस प्रकल्पाबाबत मंत्री वर्षा गायकवाडही खूश

शिक्रापूर – ओजस शाळा प्रकल्पाची सध्यास्थिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड जाणून घेतली. प्रत्येक शाळेला दहा मिनिटांचा सादरीकरण अवधी दिला. पण वाबळेवाडी आंतरराष्ट्रीय शाळेला सादरीकरणाबाबत जास्त वेळ दिला. वाबळेवाडीला लवकरच येण्याची ग्वाही दिल्याची माहिती शाळा प्रतिनिधी सतीश वाबळे व मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी दिली.

भाजप सरकारमधील शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रोत्साहनातून व वाबळेवाडी आंतरराष्ट्रीय शाळेला केंद्रस्थानी ठेवून राज्यात 13 ओजस व 100 तेजस शाळानिर्मितीचे काम सुरू झाले. या शाळांना स्व. अटलविहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा असे नामकरण करून या शाळांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रमही विकसित करण्यात आला आहे. वाबळेवाडी शाळेसह कराड नगरपालिका शाळा (कराड, सातारा), जिल्हा परिषद शाळा साखरा ( जि. वाशिम ), श्रीरामतांडा ( जि. जालना ), लांजा ( जि. रत्नागिरी ), कोळपांढरी ( जि. नंदुरबार ), खर्शी ( जि.भंडारा ) आदी शाळा प्रतिनिधींसमवेत मंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण विभागाच्या मुख्य सचिव वंदना कृष्णा व शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी व सर्व वरिष्ठ अधिकारी यांचेसमवेत स्वतंत्र बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. यात प्रत्येक शाळेला दहा मिनिटांचे सादरीकरण करण्यास सांगितले.

मात्र, वाबळेवाडीचे दहा मिनिटे पूर्ण झाल्यावर मुख्याध्यापक दत्तात्रय वारे व सतीश वाबळे यांचेसमवेत तब्बल सव्वा तास सर्व अधिकारी मंडळींसह उत्सुकतेने चर्चा केली. यावेळी शिक्षण सचिव वंदना कृष्णा व शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी यांनी वाबळेवाडीला भेट दिल्यानंतरचे अनुभवही उपस्थितांना सांगून सर्वांनी आवर्जून भेट द्या व आपापल्या भागातही शैक्षणिक क्रांती करण्याचे आवाहन केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.