‘फेअर प्ले’ प्रकरणी ईडीचे छापे, कोट्यवधींची मालमत्ता जप्त; विदेशी बेनामी कंपन्यांचे कनेक्शन उघडकीस

मुंबई – ईडीने फेअर प्ले प्रकरणी 12 जून रोजी मुंबईसह राज्यात 19 ठिकाणी छापे टाकले आहेत. फेअर प्ले ॲपने आयपीएल क्रिकेट सामन्याचे बेकायदेशीरपणे प्रसारण केल्याचा आरोप आहे. तसेच नुकत्याच झालेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दरम्यान या ॲपचा बेटींगसाठी वापर केल्याचे आढळून आले असल्यानं ईडीनं ही कारवाई केली.
झडतीदरम्यान ईडीने,बँक फंड, डीमॅट खातंसह लक्झरी घड्याळ अशी एकूण 8 कोटीची मालमत्ता जप्त केली आहे, अशी माहिती ईडीच्या मुंबई विभागीय कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या प्रकरणात चौकशी आणि तपास सुरु असल्याची माहिती ईडीकडन देण्यात आली आहे.
वायकॉम 18 मीडिया प्रायवेट लिमिटेडनं नोडल सायबर पोलीस, मुंबई यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. आयपीसी 1860, माहित तंत्रज्ञान कायदा,2000 आणि कॉपीराईट कायदा 1957 नुसार फेअर प्ले स्पोर्ट एलएलसी आणि इतरांविरोधात 100 कोटी रुपयांच्या नुकसान प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरुन ईडीनं कारवाई केली आहे.





